घरताज्या घडामोडीलबाड सरकार, तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

लबाड सरकार, तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

Subscribe

वीजबिलाप्रश्नी अजित दादा असा निर्णय घेतील अशी अपेक्षा नव्हती.

महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरु असून एकमेकांमध्ये समन्वय नाही. असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुण्यात आयोजित एका बैठकीतमध्ये चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजितप पवारांसोबत वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटीलन यांनी माध्यमांशी बोलताना एसपीएससी परीक्षांवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. एमपीएससीच्या मुद्द्यांवर बोलताना पाटील म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरु आहे. एकमेकांमध्ये समन्वय नाही. एक जण एक म्हणतो, एक जण एक म्हणतो. असे कसे एकाच सरकारमधले वडेट्टीवार म्हणतात? मग त्यांच्या सूरात सूर मिसळून पृथ्वीराज चव्हाण बोलतात. मग त्यांच्या सूरात सूर मिसळून नाना पटोले बोलतात. सगळ्या विषयांमध्ये सरकारमधील प्रत्येक घटक वेगळी भूमिका मांडतो. वीजबिलविषयामध्ये तेच झाल. शेतकरी प्रोत्साहन अनुदानविषयातही तेच झाल आहे. काल त्यांनी घोषणा केली आठ दिवसांनी तारीख देतो का विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा? तुम्ही लबाड सरकार आहात. अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

वीजबिल प्रश्नांवर सरकारने घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना पाटील म्हणाले की, अजित दादांकडून अपेक्षा नव्हती. अधिवेशानाच्या पहिल्या दिवशी अजित दादांनी घोषित केले की, वीज जोडण्या आम्ही तोडणार नाहीत. आणि स्थगिती. आणि शेवटच्या दिवशी ते बदलले. असे पाटील म्हणाले. तर गुरुवारी झालेल्या आंदोलन सहभागावर बोलताना पाटील म्हणाले. जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे भाजपा उभे राहणारच आहे. भाजपाचे कार्यकर्ते कधी लपून राहत नाहीत.
माझी भूमिका कमी तिथे आम्ही असते. असेही ते म्हणाले.

‘लॉकडाऊन होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी समान धोरण ठरवा’

धोरण असे ठरवायला लागेल की लॉकडाऊन होणार नाही. नागरिकांनी स्वत:हून काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासानाने निर्बंध लावले पाहिजे. लसींचा पुरेसा साठा आहे. पुण्यात आधी ३ लसीकरण सेंटर होती आता ही संख्या  ८५  करण्यात आली आहे. त्यामुळे सेंटरवरची गर्दीही कमी होईल. त्यामुळे पंच्यांन्नशी सेंटरची संख्या वाढली पाहिजे पण लसीकरणाचा साठा कमी नाही केला पाहिजे. लॉकडाऊनचा जिल्हा पातळीवर निर्णय केला पाहिजे. पण जिल्ह्यापातळीवर निर्णय काय घेतला पाहिजे याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी समान दिला पाहिजे. की नो लॉकडाऊन. सक्ती. या संदर्भात सगळ्या जिल्ह्यांना लाईडलाईन्स दिल्या पाहिजेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यानुसार नियम ठरतील. विभागीय आयुक्त रावांनी खूप चांगला अहवाल मांडला. टाटाने एक सर्वे केला, त्यात तीन ठिकाणे दिली आहेत. मॉल, रेस्टॉरंट, गार्डन या तीन ठिकाणी निर्बंध ठेवा. रेस्टॉरंट, मॉलमध्ये २५ पेक्षा जास्त लोक नसावे याची सक्ती करा, असेही चंद्रकात पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -