घरमहाराष्ट्रहे सरकार जून महिन्याच्या अगोदर जाणार, नारायण राणेंची नवी भविष्यवाणी

हे सरकार जून महिन्याच्या अगोदर जाणार, नारायण राणेंची नवी भविष्यवाणी

Subscribe

हे तीन पक्षांचं एक झाड आहे. त्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत. मुख्य कोणावर नाहीत. ते काय जून महिन्याच्या अगोदर जाणार आहेत. वादळ कुठल्या तारखांना येणार याची माहिती हवामानाचा अंदाज वर्तवतात त्यांच्याकडून मी घेतली. ती परिस्थिती मी राजकारणाशी जोडल्याचंही नारायण राणेंनी सांगितलंय.

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची डेडलाईन दिली आहे. नारायण राणे आज वाशिमच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. आमच्या इकडे कोकणात आहे ना अगदी मे अँड आणि जूनच्या सुरुवातीला वादळ येते. त्यात अशी हलणारी झाडं फांद्यांसकट कोसळून पडतात. हे तीन पक्षांचं एक झाड आहे. त्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत. मुख्य कोणावर नाहीत. ते काय जून महिन्याच्या अगोदर जाणार आहेत, असं म्हणत नारायण राणेंनी महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केलाय.

अरे कुठलीही लावू देत, मी राज्यात महसूलमंत्री असताना एखादी ऑर्डरवर चौकशी लावणार आहेत. सरकारी महसुलाची जागा कुठल्या अधिकाऱ्याला आणि मंत्र्याला विकता येते का ते विचारा. ती माहिती घ्या, एखाद्या सामाजिक कार्यासाठी भाड्यानं (लीज) देऊ शकतो. पण विकायचा अधिकार नाही. जी जागा आहे, त्यासाठी इन्क्वायरी लावा. एसीपीची लावा नाही, बीसीपीची लावा. आमच्या इकडे कोकणात आहे ना अगदी मे अँड आणि जूनच्या सुरुवातीला वादळ येते. त्यात अशी हलणारी झाडं फांद्यांसकट कोसळून पडतात. हे तीन पक्षांचं एक झाड आहे. त्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत. मुख्य कोणावर नाहीत. ते काय जून महिन्याच्या अगोदर जाणार आहेत. वादळ कुठल्या तारखांना येणार याची माहिती हवामानाचा अंदाज वर्तवतात त्यांच्याकडून मी घेतली. ती परिस्थिती मी राजकारणाशी जोडल्याचंही नारायण राणेंनी सांगितलंय.

- Advertisement -

शिवसेनेचे उद्योग बालिश आहेत. भाजपच्या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेक आणि तोडफोडीवर त्यांनी हल्ला चढवलाय. तोडफोड झाली म्हणून प्रशासन आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची आमची मोहीम थांबणार नाही. अडीच वर्षात एकदा मंत्रालयात आणि दोन तासांत सगळ्या फाईल्स क्लिअर केल्या. कुठली मशील आणली माहीत नाही, जापनीस मेड होती की अमेरिका मेड होती. शिवसेनेला प्रशासकीय कौशल्य असलेला मुख्यमंत्रिपदासाठी एक तरी माणूस मिळतोय का?, तीन नव्हे तर देशातील सगळे पक्ष एकत्र येऊन आमच्याविरोधात निवडणूक लढवू द्या, विजय हा आमचाच आहे, असंही ते म्हणालेत.

संजय राऊतांनी ब्लॅकमेलिंग कोणाकोणाला केलं ते सांगावं- नारायण राणे

विशेष म्हणजे नारायण राणेंनी संजय राऊतांवरही निशाणा साधलाय. संजय राऊतांना मी पत्रकार मानत नाही आणि संपादक तर नाहीच नाही. त्यांची भाषा बघा, वैचारिकता बघा, मागच्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी घाणेरड्या शिव्या घातल्या. असा पत्रकार असून ते सामनात छापून येतं. त्याला बोलायला काही जागा आहे का?, ईडीनं त्याची काळ्या पैशानं घेतलेली प्रॉपर्टी जप्त केली. त्या माणसाला लोकांना शहाणपणा सांगायचा अधिकार आणि नैतिकता नाही. मी अशा माणसाला किंमत देत नाही. संपादकाला काय पगार असतो माहीत आहे. तुम्ही रायगड समुद्र किनारी प्लॉट घेऊ शकता का?, मग सगळ्यांनी संपादक व्हा. या प्रगतीचं गौडबंगाल त्यांनी सांगावं, कसे पैसे मिळवले, ब्लॅकमेलिंग कोणाकोणाला केलं, असंही राणे म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचाः अजानला रोखलं तर महिला मंदिरांसमोर कुराण वाचतील; समाजवादी पार्टीच्या इशाऱ्याने वातावरण तापणार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -