घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीचे नेते १ सप्टेंबरला घेणार राज्यपालांची भेट

महाविकास आघाडीचे नेते १ सप्टेंबरला घेणार राज्यपालांची भेट

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये १ सप्टेंबरला भेट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेणार असल्याची चर्चा दिवसभर रंगत होती. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राजभवनावर येणार असल्याची चर्चा होती. मात्र राजभवनाकडून ही भेट होणार नसल्याचे सांगण्यात आलं त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले. नार्वेकर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीची वेळ घेण्यासाठी राजभवानावर दाखल झाले असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार गुरुवारी राज्यपालांची भेट घेणार होते मात्र त्यांनी भेटीची वेळ घेतली नसल्यामुळे राज्यापालांनी भेट नाकारली असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाविकास आघाडीतील प्रमुख मंत्री १ सप्टेंबरला भेट घेणार आहेत.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून चर्चा करण्यास सांगितले होते. राज्य सरकारने १२ सदस्यांची नावे पाठवून ८ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. राज्यपालांनी या आमदारांची नियुक्ती लवकरात लवकर करावी यासाठी महाविकास आघाडीचे तीन बडे मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. राज्यपालांनी भेट घेण्यास सांगितले असल्याचे यापुर्वी अजित पवार यांनी स्पष्ट केलं होते मात्र राज्यपालांची भेटीची वेळ घेतली नसल्यामुळे राज्यापालांनी भेट नाकारली आहे. आता १ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीतील प्रमुख मंत्री राज्यापालांची भेट घेणार आहेत.

- Advertisement -

समन्वयाचा अभाव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १२ आमदारांच्या प्रश्नावर भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राजभवनावर जाणार होते. मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांच्या भेटीची वेळ घेण्यात आली नव्हती. यामुळे राज्यपालांनी ही भेट नाकारली. यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर गुरुवार संध्याकाळी ६.४० वाजता राजभवनावर दाखल झाले. राज्यपालांच्या भेटीची वेळ घेण्यासाठी मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

राजभवनाकडून स्पष्टीकरण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची संध्याकाळची भेटीची वेळ मिळाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीतील बडे नेते राजभवनावर दाखल होणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र राजभवानकडून अशी कोणतीही भेट होणार नसून मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांच्या भेटीची वेळच मागण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यापालांच्या भेटीच्या चर्चा कोणी सुरु केली हा संशोधनाचा मुद्दा बनला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट, खासदारांना केलं आवाहन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -