महाविकास आघाडीच्या आमदारांनी केलं मतदान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘या’ निर्णयामुळे शिवसेना चिंतेत

राष्ट्रवादीकडून आमदार सुनिल तटकरे आणि मंत्री जयंत पाटील, शिवसेनेकडून सुनिल प्रभू आणि काँग्रेसकडून मंत्री अशोक चव्हाण पोलिंग एजंट आहेत.

Mahavikas Aghadi MLAs and bjp mla vote for Rajya Sabha Election
महाविकास आघाडीच्या आमदारांनी केलं मतदान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' निर्णयामुळे शिवसेना चिंतेत

राज्यात राज्यसभेच्या रिक्त जागांवरील निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील एकूण ६ जागांवर ७ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं मतांचा कोटा वाढवल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार धोक्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या आणि भाजपच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत एकूण १४३ आमादारांनी मतदान केलं आहे. महाविकास आघाडीच्या अर्ध्या आमदारांनी मतदान केलं आहे. नवाब मलिक- अनिल देशमुख यांच्या अर्जावरील सुनावणीच्या निर्याणनंतर राष्ट्रवादी पुढील रणनिती आखणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मतांचा कोठा वाढवला आहे. राष्ट्रवादीने ४२ वरुन ४४ असा मतांचा कोटा केल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार धोक्यात आले आहेत. शिवसेनेच्या काही आमादारांनी मतदान केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदान केलं आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे यांनी मतदानास सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या २० आमदारांनी तर भाजपच्या ६० आमदारांनी मतदान केलं आहे. काँग्रेसकडून १० आमदारांनी मतदान केलं आहे. शिवसेनेचे सुनिल राऊत यांसह अनेक आमदारांनी मतदान केलं आहे. आतापर्यंत ५० टक्के आमदारांचे अतदान करुन झाले आहे. भास्कर जाधव, सुनिल राऊत यांनी मतदान केलं आहे. राष्ट्रवादीकडून आमदार सुनिल तटकरे आणि मंत्री जयंत पाटील, शिवसेनेकडून सुनिल प्रभू आणि काँग्रेसकडून मंत्री अशोक चव्हाण पोलिंग एजंट आहेत.

मुख्यमंत्री – शरद पवार यांच्यात फोनवरुन चर्चा

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. बैठकीत ठरलेल्या गणितानुसार महाविकास आघाडीला मत मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतांच्या कोट्यात वाढ केल्यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली असल्याचे संजय राऊत म्हणाले. शरद पवारांनी ऐनवेळी मताचा कोटा ४२ वरून वाढवून ४४ केला आहे. महाविकास आघाडीकडे एकूण १६९ संख्याबळ आहे. परंतु राष्ट्रवादीकडून कोटा वाढवण्यात आला असल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार धोक्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याचे बोलले जात होते परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज नाहीत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.


हेही वाचा : ठरलं! राज्यसभा निवडणुकीत एमआयएम ‘या’ पक्षाला मतदान करणार