Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : 11 जिल्ह्यात मविआचा सुपडा साफ, तर 20...

Maharashtra Election Results 2024 : 11 जिल्ह्यात मविआचा सुपडा साफ, तर 20 ठिकाणी काँग्रेस हद्दपार

Subscribe

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फक्त 46 जागा जिंकता आल्या. धक्कादायक म्हणजे राज्यातील 10 जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. तर 20 जिल्ह्यातून काँग्रेसला जनतेने हद्दपार केलं आहे.

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. 230 जागा घेत महायुतीच्या वादळाने महाविकास आघाडीला भुईसपाट केलं आहे. महाविकास आघाडीला फक्त 46 जागा जिंकता आल्या. धक्कादायक म्हणजे राज्यातील 10 जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. तर 20 जिल्ह्यातून काँग्रेसला जनतेने हद्दपार केलं आहे. (Mahavikas Aghadi victory in 11 districts of the assembly elections while Congress was expelled from 20 places)

विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 तारखेला आला. यावेळी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसने 103 जागा आपले उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांना फक्त 16 जागांवर विजय मिळवता आला. धक्कादायक म्हणजे धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Shivsena UBT : संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उबाठा आग्रही; पण नियम काय?

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही विधानसभा निवडणुकीत अवस्था दयनीय झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाने 95 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांना फक्त 20 जागांवर विजय मिळवता आला. तर शरद पवार गटाने 87 जागांवर उमेदवारांना तिकीट दिले होते, मात्र त्यांच्या फक्त 10 जागा निवडून आल्या. विशेष म्हणजे शरद पवार यांनी 83 व्या वर्षी आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सभा घेतल्या होत्या. मात्र त्यानंतरही त्यांच्या पक्षाच्या कमी जागा निवडून आल्या.

- Advertisement -

या जिल्ह्यात किती जागांवर मविआचा सुपडा साफ

1. धुळे – 5 पैकी 5 जागांवर पराभव
2. जळगाव – 11 पैकी 11 जागांवर पराभव
3. वर्धा – 4 पैकी 4 जागांवर पराभव
4. गोंदिया – 4 पैकी 4 जागांवर पराभव
5. नांदेड – 9 पैकी 9 जागांवर पराभव
6. हिंगोली – 3 पैकी 3 जागांवर पराभव
7. जालना – 5 पैकी 5 जागांवर पराभव
8. छत्रपती संभाजीनगर – 9 पैकी 9 जागांवर पराभव
9. सातारा – 8 पैकी 8 जागांवर पराभव
10. सिंधुदुर्ग – 3 पैकी 3 जागांवर पराभव
11. कोल्हापूर – 10 पैकी 10 जागांवर पराभव

हेही वाचा – Tata IPL Auction 2025 : दुसऱ्या दिवशी दिग्गज अनेक खेळाडू अनसोल्ड; तर पांड्या आरसीबी संघात


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -