घरमहाराष्ट्रPrakash Ambedkar : महाविकास आघाडीच्या 50% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार; प्रकाश आंबेडकरांचे...

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीच्या 50% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार; प्रकाश आंबेडकरांचे भाकित

Subscribe

वाशिम : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत आहेत. सर्व पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागेल आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमख प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्त केले त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातली रिसोड शहारात मुस्लिम संवाद सभेमध्ये बोलतांना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर डिपॉझिट जप्त होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुस्लिमांनी योग्य उमेदवाराला मतदान केलं तर भाजपच्या 40 टक्के उमेदवारांचा आणि काँग्रेसच्या अर्ध्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त होईल. इंडिया आघाडीचं जे झालं ते महाविकास आघाडीचं झालं तरीही मुस्लिमांच्या हाती राजकीय खेळी राहू शकते. मुस्लिमांनी डोकं लावून मतदान केलं तर 48 पैकी 40 जागांवर भाजपचं मोठं नुकसान होणार आहे. काँग्रेस जर एकट्याने लढली तर त्यांच्या अर्ध्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त होणार आहे.

- Advertisement -

भाजपने मुस्लिमांना ब्लॅक आऊट केल आहे, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. याच कारणामुळे मुस्लिमांना सेक्युलर पक्षांकडे जाण्याची संधी आहे. असं असताना देखील शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि वंचित जर वेगवेगळे लढले तर धर्माचं राजकारण संपूण जाईल. कारण त्यावेळी सर्वच उमेदवार हे हिंदू असतील. त्यानंतर समाजाचं राजकारण सुरू होईल. अशावेळी जो आपल्या समाजाचे मत घेऊल क्रॉस व्होटिंगसाठी प्रयत्न करेल, जो मोठ्या समाजाचा असेल त्याला मुस्लिमांनी मतदान करावं. म्हणजे तो उमेदवार हा भाजपला चांगली लढत देऊ शकेल.

जर येत्या 15 दिवसात यांनी जागा वाटपाचा निर्णय घेतला तर हे वाचतील. नाही तर यांचे ही हाल इंडिया आघाडीसारखे होतील असे वक्तव्य आंबेडकर यांनी केलं. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडीया आघाडी तयार झाली होती. मात्र ती जेव्हा बनली तेव्हाच हे निश्चित होतं की ही तुटणार आहे, कारण याचा रिंग मास्टर पंतप्रधान नरेंद मोदी होते, असा आरोप बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.

- Advertisement -

महाविकास आघाडीत समावेश होण्यासाठी वंचितचे प्रयत्न आता फळाले आहे. उद्धव ठाकरे गटासोबत याआधीच त्यांचा सलोखा झाला. आज (ता.30 जानेवारी) रोजी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. काँग्रेसने वंचितला या बैठकीसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे त्यापूर्वीच आंबेडकर यांच्या बॉम्बने खळबळ उडाली आहे. हा दबावतंत्राचा भाग तर नाही ना, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -