कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ‘मविआ’ उमेदवारी अर्ज भरणार – अजित पवार

कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवाराचा अर्ज उद्या भरणार असल्याचे घोषणा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. तसेच, या पोटनिवडणुकीसाठी घड्याळ्याच्या चिन्हावरचाच उमेदवार असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

mastermind behind attacks on political leaders should be found : Ajit Pawar

कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवाराचा अर्ज उद्या भरणार असल्याचे घोषणा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. तसेच, या पोटनिवडणुकीसाठी घड्याळ्याच्या चिन्हावरचाच उमेदवार असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले. आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. (mahavikas aghadi will file nomination form for Kasba Peth and Chinchwad by-elections says Ajit Pawar)

पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार (8 जानेवारी 2023) अखेरचा दिवस आहे. मात्र, आज रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरणार असल्याचे सांगितले.

पोटनिवडणुकीसाठी घड्याळ्याच्या चिन्हावरचाच उमेदवार असेल

नुकताच महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, या चर्चेनंतर ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पवारांनी सांगितले. या पोटनिवडणुकीसाठी घड्याळ्याच्या चिन्हावरचाच उमेदवार असेल. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव अजित पवार यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी कोणाला उमेदवार देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी फोनवरून चर्चा केली. परंतु, मागील काही काळात मुंबई वगळता इतर ठिकाणी झालेल्या पोटनिवडणूक लढवण्यात आल्या होत्या.


हेही वाचा – भाजपामधून आलेल्या नाना पटोलेंना महत्त्वाची आठ पदे का दिली? काँग्रेस नेत्याचाच सवाल