घरमहाराष्ट्रMahayuti: बच्चू कडू महायुतीतून बाहेर? अमरावतीत उमेदवार उभा करणार

Mahayuti: बच्चू कडू महायुतीतून बाहेर? अमरावतीत उमेदवार उभा करणार

Subscribe

अमरावती: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अमरावती लोकसभेच्या जागेसाठी बच्चू कडू आपला उमेदवार उभा करणार आहेत. तशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. अमरावती मतदार संघासाठी चांगला उमेदवार मिळाला असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवत महायुतीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mahayuti Bachchu Kadu out of Mahayuti Candidates will be fielded in Amravati)

बच्चू कडूंचा दावा काय?

अमरावती लोकसभा मतदार संघात प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार उभा करू आणि हा उमेदवार 1 लाख मतांच्या फरकाने निवडून येईल, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केल्याने महायुतीतील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अमरावतीत मैत्रिपूर्ण लढत होईल, असे सांगून तूर्तास आपण महायुतीतच असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे असले, तरी ते महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

अमरावतीच्या जागेवर भाजपच लढेल, पक्षचिन्हावर निवडणूक लढवली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भादपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. पण, जागावाटपाच्या चर्चेच्या वेळी आपल्याला विश्वासात घेतल्या गेले नाही, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

बच्चू कडूंची नाराजी काय?

प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. जिल्ह्यात मोठी ताकद आहे. तरीही प्रहारचा विचारही केला जात नाही, ही प्रहारच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे. आमदार रवी राणांकडून धमक्या मिळत आहेत. महायुतीला आमची गरज नाही, असं दिसत आहे. त्यामुळे आम्ही अमरावतीतून लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला योग्य उमेदवार सापडलेला आहे. तो सक्षम आहे आणि 1 लाख मतांच्या फरकाने तो निवडून येईल. उमेदवाराचे नाव येत्या 6 एप्रिलला जाहीर करण्यात येईल, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीसोबत; पवारांशी केवळ चर्चाच)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -