Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMahayuti : आमची टिंगलटवाळी केली पण...; विजयानंतर काय म्हणाले अजित पवार?

Mahayuti : आमची टिंगलटवाळी केली पण…; विजयानंतर काय म्हणाले अजित पवार?

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. “मी राजकारणात आल्यापासून महाराष्ट्रात कधीही कोणाला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश दुसऱ्या कोणाला मिळालेले मी पाहिलेले नाही. विरोधकांकडून आमची टिंगलटवाळी करण्यात आली पण तरीही महायुतीच्या विकास कामाकडे बघून मतदारांनी आम्हाला निवडणून दिले आहे,” असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही हुरळून जाणार नाही, कारण आता यामुळे आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे.” असेदेखील ते पुढे म्हणाले. (Mahayuti DCM Ajit Pawar reaction after Maharashtra Election Results 2024)

हेही वाचा : Maharashtra Election Result 2024 : पालघरमधून शिट्टी गायब; ठाकूर पितापुत्रांचा पराभव 

- Advertisement -

पुढची 5 वर्ष एकत्र काम करणार

“आम्हाला मतदारराजाने प्रचंड अशा प्रकारांचे यश प्राप्त करून दिले आहे. त्यासाठी महायुतीकडून तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे आम्ही आभार मानतो.” असे म्हणत अजित पवारांनी अभिवादन केले. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, “आमच्या योजनाची चेष्टामस्करी करण्यात आली. यासाठी आम्हाला दोषही देण्यात आला होता. राज्याची तिजोरी रिकामी करत आहोत अशी टीका आमच्यावर करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण राज्याने पाहिले की कोणताही हिशोब न देता जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले.” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

लोकसभेच्या पराभवानंतर…

“लोकसभेत आम्हाला मोठे अपयश आले. आमच्या ध्यानीमनीही नव्हते की आम्हाला अपयश मिळेल. आम्ही ते मान्य केले, त्यानंतर आम्ही यातून सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प जाहीर करताना आम्ही काही योजना जाहीर केल्या. त्या योजना इतक्या लोकप्रिय झाल्या, की लाडकी बहीण ही गेमचेंजर ठरली. लाडक्या बहि‍णींनी अशी काय जादू केली की, सगळे विरोधक उताणे पडले.” अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, “विरोधक टीका करतात की बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायला हवी होती. मग ती लोकसभेलाही घ्यायला हवी होती. तेव्हा ईव्हीएम बरोबर होते का? झारखंड आमच्या हातून गेले आहे. आम्ही काही म्हटले का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -