Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीMahayuti : माझ्या विजयाची माझ्यासकट जनतेला 100 टक्के खात्री; अढळराव पाटलांचा दावा

Mahayuti : माझ्या विजयाची माझ्यासकट जनतेला 100 टक्के खात्री; अढळराव पाटलांचा दावा

Subscribe

ज्या आर्थी मी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतोय, त्याआर्थी उमेदवारी निश्चित होईल का? असे प्रश्न विचारण्याची गरज नाही. माझ्या विजयाची माझ्यासकट जनतेला 100 टक्के खात्री आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी केला आहे. शिवाजराव अढळराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

ज्या आर्थी मी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतोय, त्याआर्थी उमेदवारी निश्चित होईल का? असे प्रश्न विचारण्याची गरज नाही. माझ्या विजयाची माझ्यासकट जनतेला 100 टक्के खात्री आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी केला आहे. शिवाजराव अढळराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशाबाबत बैठक झाली. त्यानुसार, मंगळवार, 26 मार्च रोजी अढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. (Mahayuti People with me are 100 percent sure of my victory Adhalrao patil claim in mumbai)

अजित पवारांच्या भेटीनंतर शिवाजराव अढळराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार माझा 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघात (शिरूर) हा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात अनेकजण मोठ्याप्रमाणात उपस्थिती दर्शवणार आहेत”, असे सांगितले.

- Advertisement -

राष्ट्रवादीतील प्रवेशाला मुख्यमंत्री शिंदेंनी सिग्नल दिला का, असा सवाल अढळराव पाटलांना विचारण्यात आला. त्यावर “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत माझं बोलणं झालं. तसेच, दोघांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बोलणं झालं आहे. त्यानंतर 26 तारखेच्या पक्षप्रवेशासाठी तिघांनी मला ग्रीन सिग्नल दिला आहे”, असे उत्तर अढळराव पाटील यांनी दिले.

याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमची शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी निश्चित आहे का, असाही सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “ज्या आर्थी मी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतोय, त्याआर्थी उमेदवारी निश्चित होईल का? असे प्रश्न विचारण्याची गरज नाही. माझ्या विजयाची माझ्यासकट जनतेला 100 टक्के खात्री आहे. मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलो, त्या काही नसताना जिंकलो. पहिली निवडणूक 30 हजार मतांनी जिंकलो. दुसरी निवडणूक 1 लाख 80 हजार आणि तिसरी निवडणूक 3 लाख 3 हजाराने जिंकलो. आता चौथी निवडणूक या तिन्ही निवडणुकांचे रेकॉर्ड मोडतील”, असे अढळराव पाटील म्हणाले.

- Advertisement -

“महायुतीतील घटक पक्षांना नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अबकी बार 400 पार ही केंद्र पातळीवर संकल्पना राबवण्यासाठी आहे, तर महाराष्ट्रात 45 पार ही संकल्पना राबवण्यासाठी आम्ही एकमताने काम करणार आहोत. तसेच, सगळ्या ठिकाणचे उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत”, असेही अढळराव पाटील यावेळी म्हणाले.


हेही वाचा – ARVIND KEJRIWAL : ही कसली नैतिकता? केजरीवालांच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस नेत्याचा प्रश्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -