घोडेबाजाराला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपची, महेश तपासेंची टीका

महाविकास आघाडीचा विजय निश्चित...

Mahesh Tapase

घोडेबाजारीला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपची असून राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase) यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून राज्यसभेसाठी मुद्दामहून सातवा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. घोडेबाजार करुन आमदार फुटतील असा प्रयत्न भाजपचा आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

हेही वाचा : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल वैयक्तिक माफी मागावी – महेश तपासे

महाविकास आघाडीला समर्थन देणारे घटक पक्ष आणि अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. जेव्हा राज्यसभेचे मतदान होईल त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असेल आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आलेले असतील असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत या वर्षीच्या उत्तरार्धात म्हणजे जुलै महिन्यात संपत आहे. त्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपसाठी राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.


हेही वाचा : Special Report: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावं आघाडीवर, अनेक नावांची चर्चा