घरताज्या घडामोडीमराठी माणूस पेटून उठल्यावर उच्चपदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते - महेश...

मराठी माणूस पेटून उठल्यावर उच्चपदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते – महेश तपासे

Subscribe

मुंबई आणि ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाजूला केल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. त्या लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान राज्यपाल भगत सिंह यांनी केल्यानं मोठा वादंग निर्माण झाला होता. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संपालाची लाट उसळली होती. दरम्यान, काही राजकीय नेत्यांचा राज्यापालांच्या वक्तव्याला पाठींबा होता. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, मराठी माणूस पेटून उठल्यावर उच्चपदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केली आहे.

काय म्हणाले महेश तपासे?

- Advertisement -

मराठी माणूस स्वाभिमानासाठी पेटून उठतो तेव्हा उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते हे त्याचे उदाहरण आहे, असे महेश तपासे म्हणाले. मागच्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल जे वक्तव्य केले होते त्यासंदर्भात मराठी लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मंगळवारी गुजरात फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अमराठी लोकांनी मराठी शिकावे असे वक्तव्य राज्यपाल यांनी केले आहे. या वक्तव्याचे महेश तपासे यांनी स्वागत करताना महाराष्ट्रात राहणार्‍यांनी मराठी शिकली आणि बोलली पाहिजे असे स्पष्ट केले.

राज्यापालांचा जाहीर माफीनामा

- Advertisement -

दरम्यान, राज्यपालांनी त्या विधानावरून प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर माफी मागितली आहे. माझ्याकडून कदाचित काही चूक झाली आहे. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतिपथावर अग्रेसर होत आहे, असं राज्यपालांनी पत्रकात म्हटले आहे.


हेही वाचा : मोठी बातमी! नवी वॉर्ड रचना रद्द, २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका होणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -