Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राष्ट्रवादी व काँग्रेसने मुस्लिम समाजाला दिलेल्या 5 टक्के शैक्षणिक आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने...

राष्ट्रवादी व काँग्रेसने मुस्लिम समाजाला दिलेल्या 5 टक्के शैक्षणिक आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने भूमिका स्पष्ट करावी – महेश तपासे

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसने मुस्लिम समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकरित्या शैक्षणिक आरक्षण पाच टक्के देण्याची तरतूद केली होती. आता यावर शिंदे – फडणवीस सरकारचे काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

राज्यातील ५६ मुस्लिमबहुल शहरातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचे सर्वेक्षण ‘टीस’ या संस्थेच्या माध्यमातून राज्यसरकार करणार आहे. मुळात देशपातळीवर मुस्लिम समाजाबद्दल भाजपची काय भूमिका आहे हे वेगळे सांगायला नको, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

सबका साथ, सबका विकास हा मंत्र मोदींनी दिला मात्र २०१४ नंतर भाजप राजवटीत मुस्लिम समाजाबाबत काय काय घडलं हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता राज्यसरकार हे सर्वेक्षण करत आहे. मात्र, राज्यसरकारचा हेतू शुद्ध असेल तर त्यांचे स्वागत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -