घरताज्या घडामोडीअजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान - महेश तपासे

अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान – महेश तपासे

Subscribe

देहु येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू देण्यात आले नाही हा भाजपने महाराष्ट्राचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज देहु येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची अडचण झाली असती, रोहित पवारांचा हल्लाबोल

अजित पवार यांना राज्यातील शेतकऱ्यांचे, कास्तकर्‍यांचे त्याचप्रमाणे वारकऱ्यांचे देखील प्रश्न माहीत आहेत. पुणे जिल्हा हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी कार्यक्रम होत असताना महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही हा अपमान जाणुनबुजुन करण्यात आला का? हा महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रकार होता का? असे अनेक प्रश्न महेश तपासे यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे.


हेही वाचा : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -