घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे उद्या मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन

राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे उद्या मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ओबीसी सेलच्या पदाधिकार्‍यांचे मुंबईमध्ये (Mumbai) दिनांक २५ मे रोजी राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिली. या अधिवेशनाला प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री अदिती तटकरे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित राहणार आहेत.

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे ही राष्ट्रवादी व महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi Government) कायम भूमिका राहिली आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  हे ओबीसी आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करत आहेत असेही महेश तपासे म्हणाले.

- Advertisement -

भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला…

मनसेने पवारसाहेबांचा २०१८ चा फोटो व्हायरल करुन जो संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा राजकारणाशी काहीही संबध नाही. पवारसाहेब राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि ब्रिजभूषण हेही भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला आहे. मनसेकडून केलेला आरोप हा बिनबुडाचा व चुकीचा आहे. मनसेला राजकारणात महत्त्व उरलेले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर ते बोलत आहेत असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

ओबीसी पदाधिकाऱ्यांचे उद्या बुधवारी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश द्वारे केंद्र सरकार कडून ओबीसींचे हक्क हिसकावण्याच्या विरोधात, सापत्नीक वागणूक, जातीय जनगणना, ओबीसींचं राजकीय आरक्षण, बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्यावर आलेले आर्थिक संकट, ओबीसी व्हिजेएनटी यांच्यासाठी संघर्षाचा लढा, मंडल आयोगाची संपूर्णपणे अंमलबजावणी अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल.

- Advertisement -

हेही वाचा : तारकर्लीत पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली, दोघांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -