महिरावणीच्या कृतिका, ऋतुजाची अवकाश भरारी; नाशिकच्या शिरपेचात रोवला मानाचा तूरा

नाशिक : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन,डॉ.मार्टिन फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले “हायब्रीड रॉकेट” मिशन हे देशभरातील इयत्ता सहावी ते बारावीच्या ५००० विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या विकसित केले. त्यात नाशिक जिल्ह्यातील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या महिरावणी येथील मातोश्री गि.दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या बालवैज्ञानिक कुमारी कृतिका माधव खांडबहाले (इ.८वी)आणि कुमारी ऋतुजा विलास काशीद(इ.९वी) या विद्यार्थिनींचा समावेश आहे.या मुलींनी देशात महिरावणी शाळा व गावाचे नाव उज्वल केले असून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे.

रविवारी तामिळनाडू राज्यातील पट्टीपलम् येथून स्पेस झोनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंदा मेगलिंगम,तेलंगणा राज्याचे राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन तसेच इस्रोचे शास्त्रज्ञ,डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम शेख,महाराष्ट्र राज्य सचिव मिलिंद चौधरी,समन्वयिका मनीषा चौधरी इ.च्या प्रमुख उपस्थितीमध्ये देशभरातील मुलांनी तयार केलेले १५० पिको उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडण्यात आले. यावेळी महिरावणी शाळेच्या कुमारी कृतिका खांडबहाले आणि कुमारी ऋतुजा काशीद तिच्या दोन्ही पालकांसह उपस्थित राहून तामिळनाडू येथील पट्टीपलम येथील कार्यशाळेत पिको सॅटॅलाइटची यशस्वीरित्या चाचणी केली.

या मुलांनी तयार केलेले पिको सेटॅलाइट हे आकाशात उंचावर जाऊन काही काळ तेथील माहिती गोळा करू शकणार आहे.स्पेस झोन इंडियाचे प्रमुख डॉक्टर आनंदा मेगलिंगम यांनी सांगितले की,शालेय बाल वैज्ञानिकांसाठी हे व्यासपीठ आहे,जे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यास आणि या क्षेत्रात करिअरच्या संधी शोधण्यास मदत करत असते. नाशिक जिल्ह्यातील महिरावणी येथील शाळेच्या या दोन्ही बालवैज्ञानिकांनी शाळेबरोबर गावाचे नाव देशामध्ये मोठे केले असून ही बाब अभिमानास्पद आहे.

राधिका फाउंडेशनच्यावतीने बालवैज्ञानिक क्रितिका खांडबहाले व ऋतुजा काशीद सन्मानित

मातोश्री गि.दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी बालवैज्ञानिक कुमारी क्रितिका खांडबहाले व कुमारी ऋतुजा काशीद यांनी पिको सॅटेलाइट बनविल्याबद्दल राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सेवक,जिल्हा अध्यक्ष कल्पना सोनार व शांतिनिकेतन स्कूलच्या प्रिन्सिपल प्राची मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

डॉ.एपीजे अब्दुल कलाम सेटॅलाइट व्हेईकल मिशन लॉन्च २०२३ तामिळनाडू येथील पट्टीपलम येथून दिनांक १९ फेब्रुवारी रोजी देशभरातील मुलांनी तयार केलेले १५० पिको उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडण्यात आले. महिरावणी येथील मातोश्री गि.दे.पाटील माध्यमिक विद्यालयाच्या कु. क्रितिका माधव खांडवाले व कु.ऋतुजा विलास काशीद या बालवैज्ञानिकांचाही सहभाग होता.मुलांनी बनवलेल्या “पिको सॅटॅलाइट”देशातील पहिला उपक्रम ठरला असून त्याची जागतिक ग्रिनीज बुकने नोंद घेतली आहे. : बाळासाहेब सोनवणे, जिल्हा समन्वयक,डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन,रामेश्वरम राज्य- तामिळनाडू,नाशिक जिल्हा