घरताज्या घडामोडीmahrashtra budget 2021- तिर्थक्षेत्रांसाठी विशेष निधीचा प्रस्ताव

mahrashtra budget 2021- तिर्थक्षेत्रांसाठी विशेष निधीचा प्रस्ताव

Subscribe

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितपवार यांनी यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ सादर केला यामध्ये तीर्थक्षेत्रांसाठी निधीचा प्रस्ताव मांडण्यात आला

महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्मंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ सादर केला होता. त्यात तिर्थक्षेत्रांसाठी विशेष निधीचा प्रस्ताव मांडण्यात आला.

आपल्या प्राचीन परंपरा, श्रद्धास्थाने व संस्कृतीचे जतन करणे हे आपल्या सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे. शेकडो वर्षांचा वारसा असलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्द असलेल्या प्राचीन मंदीरांचे जतन व संवर्धन करण्याचे काम म्हणूनच आमच्या शासनाने प्राधान्याने ठरविले आहे. राज्यातील एतिहासिक आणि तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आणि तेथील पर्यटन वाढवण्यासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक आठ प्राचीन वैशिष्ट्य पूर्ण मंदिरे यासाठी निवडली आहेत. धूतपापेश्वर मंदिर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, एकविरा माता मंदिर कारले तालुका मावळ जिल्हा पुणे, गोंदेश्वर मंदिर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, खंडोबा मंदीर, सातारा तालुका व जिल्हा औरंगाबाद, भगवान पुरुषोत्तमपुरी मंदिर तालुका माजलगाव जिल्हा बीड, आनंदेश्वर मंदिर, लासूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती, शिवमंदीर मार्कंडा तालुका चार्मोली जिल्हा गडचिरोली, या मंदीराचा त्यामध्ये समावेश आहे. या कामासाठी सन २०२१-२२ मध्ये १०१ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.

- Advertisement -

या व्यतीरिक्त तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात देशातील बारा ज्योतीलिंगापैकी महाराष्ट्रातील काही तीर्थक्षेत्र, खंडेरायाची जेजुरी म्हणून ओळखले जाणारे काही तीर्थक्षेत्र, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे काही तिर्थक्षेत्र, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या संप्तश्रृंगीचे तीर्थक्षेत्र या सर्व तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिताही निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.


हे वाचा- Maharashtra Budget 2021 : मुंबईला महाविकास आघाडी सरकारचा ‘मेगा’ बुस्टर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -