घरमहाराष्ट्रराज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

Subscribe

राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार आले असून विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार आले असून विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी बाकावर राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष झाला आहे. यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड करण्यात येईल याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून होते. विरोधी पक्षनेता पदाच्या शर्यंतीत अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची नावेही होती. मात्र शेवटी सर्वांनी अजित पवार यांच्याच नावाला पसंती दिली होती. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव मतदान झाल्यानंतर अध्यक्षांना अजित पवार हेच विरोधी पक्षेनेते असतील असे पत्र देण्यात आले होते. मात्र त्याची घोषणा आता करण्यात आली आहे.

- Advertisement -

अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. सरकारमध्ये असतानाही त्यांनी अनेकवेळा विरोधी पक्षाला कधी कोपरखळ्या मारत तर कधी सडेतोड जाब विचारत हैराण केल्याचे अनेकवेळा पाहण्यात आले आहे. तसेच त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदरयुक्त धाकही आहे. विरोधी पक्षेनेतेपदी अशीच व्यक्ती असणे अपेक्षित असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नावावर शि्कामोर्तब केले. दरम्यान अजित पवार यांनी चार वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

अजित पवार यांचा थोडक्यात परिचय

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच निवड झालेल्या अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 मध्ये देवळाली-प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे झाला.

त्यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत झाले असून मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. शेती हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. तसेच अजित पवार विवाहीत असून यांच्या पत्नीचे नाव सुनेत्रा आहे. त्यांना दोन मुलगे असून पार्थ आणि जय अशी त्यांची नावे आहेत. पार्थ हा राजकारणात सक्रिय आहे. अजित पवार यांना क्रिकेट, टेनिस व समाजकार्याची आवड आहे.
.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -