घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: कोरोनाचा धोका कायम! राज्यात ४७,२८८ नवे रुग्ण 

Maharashtra Corona Update: कोरोनाचा धोका कायम! राज्यात ४७,२८८ नवे रुग्ण 

Subscribe

आज राज्यात कोरोनामुळे १५५ जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच सोमवारी कोरोनाबाधितांच्या आकड्यात थोडी घट झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी राज्यात ५० हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. मात्र, सोमवारी राज्यात ४७,२८८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० लाख ५७ हजार ८८५ झाली आहे. राज्यात ४,५१,३७५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आज राज्यात कोरोनामुळे १५५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५६,०३३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका आहे.

१५५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू 

- Advertisement -

राज्यात सोमवारी १५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई २१, ठाणे मनपा ९, रायगड ७, नाशिक ११, पुणे ६, सोलापूर ६, जालना १२, लातूर ९, नांदेड २३, अमरावती ५, नागपूर १०, वर्धा ५ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्यूंपैकी ९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

२६,२५२ रुग्ण बरे

आज २६,२५२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३६ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -