घरक्राइम८ वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने तोडला घरमालकाचा विश्वास आणि...

८ वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने तोडला घरमालकाचा विश्वास आणि…

Subscribe

मोलकरणींने घरमालकाचा विश्वास घात केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे.

बऱ्याचदा घरकाम करणाऱ्या व्यक्तींवर सहजासहजी विश्वास ठेवणे फार कठीण असते. कोणत्याही व्यक्तीवर सहज विश्वास ठेवला जात नाही. मात्र, खूप वर्ष झाली का मोलकरणीवर मालकाचा विश्वास बसतो. मात्र, कितीही वर्ष झाली तरी एखादी व्यक्ती कधी विश्वास घात करेल हे काय सांगता येत नाही, अशीच एक घटना समोर आली आहे. तब्बल आठ वर्ष काम करणाऱ्या मोलकरणीने मालकाचा विश्वास तोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

नेमके काय घडले?

मूळच्या कर्नाटक येथील चंद्रम कोंकणगाव येथे राहणाऱ्या बंगारेव्वा हराळे (४९) ही महिला पुण्याच्या हडपसर येथे राहणाऱ्या फराटे यांच्या घरी पूर्ण वेळ घरकाम करायची. गेल्या आठ वर्षांपासून ही महिला विजय फराटे (३३) यांच्या वडिलांचा सांभाळ करत होती. त्यामुळे विजय यांचा तिच्यावर विश्वास होता. मात्र, तिने घरमालकाचा विश्वास केला. ५ मार्च रोजी फराटे दुपारच्या वेळेस आपल्या वडिलांना घेऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर आरोपी बंगारेव्वा हराळे या मोलकरणीने घरात शोधाशोध करत कपाटातील दागिने आणि रोख अडीच हजार रुपये चोरत तब्बल १४ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन कोल्हापूरच्या दिशेने पळाली. त्यानंतर ती सिंधुदुर्गला गेली. याबाबत माहिती मिळताच फराटे यांनी मोलकरणीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तिच्या मागावर होतेच. अखेर पोलिसांना तिच्याबाबत माहिती मिळाली आणि तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने चोरीची कबुली दिली आणि तिला अटक करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – हिरेन मृत्यूप्रकरण: कोणालाही अशापद्धतीने आयुष्यातून उठवू नका – धनंजय गावडे


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -