Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र जातीय सलोखा राखा, शिवरायांचा आदर्श ठेवा; दंगलींप्रकरणी अजित पवारांचे जनतेला आवाहन

जातीय सलोखा राखा, शिवरायांचा आदर्श ठेवा; दंगलींप्रकरणी अजित पवारांचे जनतेला आवाहन

Subscribe

मुंबई – छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीच्या मध्यरात्री तुफान राडा झाला. दोन्ही गट एकमेकांत भिडले. तसंच, खासगी वाहनांसह पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. यामुळे तेथील वातावरण तापले आहे. तसंच, जळगावसह मुंबईतील मालाड मालवणी येथे दंगली घडत आहेत. असं असतानाच याप्रकरणी ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यता आले असून काहींना ताब्यातही घेण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणात सर्वांनी जातीय सलोखा राखण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. ते आज मुंबईत बोलत होते.

संभाजी नगरची अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. आता सध्या शांततेचे प्रयत्न सुरू आहे. मी विरोधी पक्षाचा नेता असलो तरीही मी माझ्याकडून कोणतंही वक्तव्य जाऊन देणार नाही जेणेकरून तेथील वातावरण खराब होईल. सर्वच राजकीय पक्षांनी, सामाजिक कार्यकर्ते, जनतेने शांतता प्रस्थापित करण्याकरता प्रयत्न करावेत. आमच्या सर्व सहकार्यांनाही सांगितलं आहे. पुन्हा छत्रपती संभाजीनगरमधील समस्त बांधवांना एवढंच आवाहन करेन की यातून जातीय सलोखा ठेवूनच मार्ग काढावा लागेल, कृपाय कोणीही त्या माथी भडकवून देण्याचं काम करू नये. जाती-धर्म-पंथांमध्ये लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नका. आपल्या महापुरुषांची शिकवण लक्षात घ्या. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी कशापद्धतीने स्वराज्याची स्थापना केली ते लक्षात ठेवा, हे मी आवाहन करतो, असं अजित पवार आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – पवार कुटुंबात वाद; नरेश म्हस्केंचा अजित पवारांवर निशाणा

दरम्यान, २ एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून संयुक्तरित्या सभा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सद्यस्थिती पाहता तेथे सभा होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याबाबत अजित पवारांना विचारले असता ही सभा नियोजित वेळेत होणार असल्याचे सांगितले. तसंच, सभेचे आयोजक आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परिस्थितीनुसार पुढे निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

मी नरेश म्हस्केंना ओळखत नाही

वार कुटुंबात वाद आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार हे निवडून येऊ नयेत यासाठी खुद्द अजित पवार यांनी अनेकांना फोन केले होते, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे, याबाबत आज अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मी नरेश म्हस्केंना ओळखत नाही, असं अजित पवार म्हणाले. ते म्हणाले की, नरेश म्हस्केंना मी ओळखत नाही, त्यामुळे असल्या आलतूफालतू स्टेटमेंट करणाऱ्याला मी महत्त्व देत नाही. आमच्या घरात अशापद्धतीने वागत नाही. आमच्या घरातील भूमिका अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. रोहीत पवार माझ्या कुटुंबातील एक आहे, माझा पुतण्या आहे, मला माझ्या मुलासारखा आहे, असंही अजित पवार पुढे म्हणाले.

- Advertisment -