घरमहाराष्ट्रसर्व नागरिकांशी सुसंवाद ठेवा, अनुराग ठाकूर यांचे आकाशवाणी, दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांना आवाहन

सर्व नागरिकांशी सुसंवाद ठेवा, अनुराग ठाकूर यांचे आकाशवाणी, दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांना आवाहन

Subscribe

मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आज मुंबईतील आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन आणि पत्र सूचना कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यालयांना भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सुसंवाद ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात ठाकूर यांनी स्वच्छता 2.0 मोहिमेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि देशात सर्वत्र जलदगतीने सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेचा वेग कायम ठेवण्याचे आवाहन सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले.

केंद्रीय मंत्र्यांनी सर्वप्रथम चर्चगेट येथील आकाशवाणी प्रसारण भवनाला भेट दिली आणि विविध कार्यालयांमध्ये फिरून त्यांच्या कामांचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी वरळी येथील दूरदर्शन केंद्र आणि मरीन लाइन्स येथील पत्र सूचना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठका घेतल्या. त्यांनी संपूर्ण परिसराचा फेरफटका मारला आणि तेथील स्वच्छता उपक्रमांबाबत माहिती घेतली. तसेच त्यांनी डॉ. जी. देशमुख मार्गावरील फिल्म्स डिव्हिजनलाही भेट दिली.

- Advertisement -

या सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध जागेचे प्रभावी व्यवस्थापन करावे, अशी सूचना त्यांनी केली. स्वच्छता कृती मोहिमेचा एक भाग म्हणून ठाकूर यांनी सर्व संबंधितांना अनावश्यक कागदपत्रे, फाइल्स काढून टाकण्याचे आणि भंगार साहित्याचा लिलाव करण्याचे निर्देश दिले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी, आकाशवाणी आणि दूरदर्शनचे पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक जुगल चंदिरा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हिमाचल मित्र मंडळाच्या कार्यक्रमात सहभाग
मुंबई दौऱ्यात अनुराग ठाकूर काल ‘हिमाचल मित्र मंडळ’ संस्थेच्या 71व्या स्थापना दिन सोहळ्यात सहभागी झाले. मुंबईत राहणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान त्यांनी संस्थेच्या सदस्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले. हिमाचल मित्र मंडळ ही धर्मादाय संस्था 1952मध्ये स्थापन झाली असून ही संस्था हिमाचल प्रदेशातील संस्कृतीला प्रोत्साहन देणे, गरजूंना वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि कर्करोगग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत निवासव्यवस्था पुरवणे इत्यादी कार्य सातत्याने करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -