घरमहाराष्ट्रसाळाव-रेवदंडा पुलाची दुरवस्था

साळाव-रेवदंडा पुलाची दुरवस्था

Subscribe

अलिबागसह मुरुड आणि रोहे तालुक्यांना जोडणार्‍या साळाव-रेवदंडा पुलाची कमालीची दुरवस्था झाली असून, महाडच्या सावित्री पुलासारखी दुर्घटना घडण्यापूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांसह वाहनचालक आणि प्रवाशांतून होत आहे.

या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग कार्यालयाने दुर्लक्ष केल्यामुळे पुलाला भेग पडून त्यातून खालून वाहणार्‍या नदीचे पाणी स्पष्ट दिसत होते. नंतर बांधकाम विभागाने लोखंडी पट्टी [पत्रा ] लावून त्या ठिकाणी कॉक्रिटीकरण करून घेतले. तसेच खड्डे देखील बुजविण्यात आले होतॆ. परंतु काही महिन्यांपूर्वी परत एकदा भेग पडली आणि तीही बुजविण्यात आली. मात्र पुलाचे दोन्ही बाजूच्या कठड्यांची दुरवस्था होऊन काही कठड्यांचा भाग समुद्रात कोसळला आहे. आता तर दोन ते तीन ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, तेथे खडी आणि दगड टाकून ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक करू नये, असे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असतानासुद्धा अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. परिसरातील बोर्ली येथे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत एका बंधार्‍याचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. बंधार्‍यासाठी आवश्यक असणार्‍या दगड आणि इतर साहित्य हे या पुलावरून मोठ्या ट्रकमधून काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या आणण्यात येत होते. तसेच जेट्टीच्या बांधकामासाठी आवश्यक असणार्‍या साहित्याची वाहतूक अवजड वाहनाने करण्यात येत होती. मात्र याबाबत प्रसारमाध्यमांनी वारंवार लक्ष वेधल्याने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. पर्यटनाच्यादृष्टीने या पुलाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने त्याच्या डागडुजीबरोबर मजबुतीकरणही करण्याची मागणी प्रकर्षाने पुढे येत आहे.

काही दिवसांपूर्वी अलिबागचा कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर साळाव पुलाची पाहणी केली असून, दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयात पाठवून देण्यात येणार आहे.
-नरेश नाईक, प्रभारी उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -