घरताज्या घडामोडीगव्हाऐवजी मका खा !

गव्हाऐवजी मका खा !

Subscribe

रेशनवर गव्हाचे प्रमाण कमी करून मिळणार मका

सरकारने आधारभूत किंमतीत खरेदी केलेला मका स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे प्रमाण कमी करून मका दिला जाणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिने रेशन दुकानातून मका वितरण केले जाणार आहे.

आतापर्यंत जिल्हयातील मका खरेदी केंद्रावर १ लाख ५७ हजार २०६ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक गोरगरिब आजही रेशनवरील गहू आणि तांदूळावर आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. त्यात कोरानामुळे लागू केलेल्या लॉकडाउननंतर तर अनेकांचे संसार उध्दवस्त झाल्याने रेशन दुकानाचा गहू आणि तांदळाचा अनेकांना पोट भरण्यासाठी मोठा आधार मिळाला. जानेवारी महिन्यापर्यंत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ३ किलो गहू २ रूपये प्रतीकिलो दराने तर २ किलो तांदूळ ३ रूपये प्रतीकिलो दराने दिला जात होता. अंत्योदय कार्डधारकांना प्रतीकार्ड १५ किलो गहू २ रूपये प्रतीकिलो दराने तर २० किलो तांदूळ ३ रूपये प्रतीकिलो दराने वितरित करण्यात आला.

- Advertisement -

शासन आदेशानूसार पुढील दोन महिने मका पुरवठा करण्यात येईल. तर गहूही रेशनकार्डधारकांना पुरवला जात आहे. एक रूपये प्रती किलोप्रमाणे हा मका वितरित केला जाईल.
अरविंद नरसीकर, जिल्हा पूरवठा अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -