घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमधील शिर्डी- सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

नाशिकमधील शिर्डी- सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

Subscribe

नाशिकमधील शिर्डी- सिन्नर महामार्गावरील पाथरे शिवाराजवळ आज (१३ जानेवारी) सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी असल्याचेही भीती व्यक्त केली जात आहे. यात बसमधील सर्वाधिक प्रवासी जखमी झाल्याचं म्हटले जातेय. मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नाशिकला येणाऱ्या खाजगी बस नाशिकहून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकची समोरासमोर धडक झाली. यावेळी पाथरे ते पिंपळवाडी टोलानाक्यावर एकेरी वाहतूक सुरु होती.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीनं तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. यातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचे अनेक फोटो समोर आले असून त्यातून अपघाताची भीषणता स्पष्ट होतेय.

- Advertisement -

या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून बसची एका बाजूने पूर्णपणे तुटली आहे. या अपघातग्रस्त बसमधून ठाणे परिसरातील जवळपास 50 प्रवासी शिर्डीला जात होते. उल्हासनगरहून शिर्डीतील साई बाबांच्या दर्शनासाठी 15 बसेस निघाल्या होत्या, या बसेसमधील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे निर्देश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च पूर्णपणे शासन उचलणार आहे.


दिल्लीपासून ते स्पेनपर्यंत झाले ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाचे शूटिंग

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -