घरमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू तर ३ जखमी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू तर ३ जखमी

Subscribe

समृद्धी महामार्गानवर एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव – दुसरबिडमध्ये समृद्धी कॅम्पसच्या जवळ झाला हा अपघात झाला आहे. लोखंडी सळई आणि काही मजुरांना घेऊन जाणारा ट्रक पलटी झालेल्या हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील सिंदखेडराजा दुसरबीड येथून काही मजुर आणि लोखंडी सळई घेऊन एक ट्रक समृध्दी महामार्गावरून जात होता. त्याचवेळी तळेगावदरम्यान हा ट्रक पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघात मृत्यूमुखी पडलेले समृध्दी महामार्गावर काम करणारे  बिहारी मजुर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एकूण १५ मजुरांपैकी १२ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी मजुरांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

सध्या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा संपूर्ण महामार्ग लवकरचं पूर्ण करत वाहतुकीसाठी सुरु करण्याच्या दृष्टीने सरकार पाऊले उचलत आहे. त्यामुळे संपूर्ण महामार्गावर अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. याचदरम्यान तळेगाव येथे हा भीषण अपघात घडला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -