घरमहाराष्ट्रकैलास गोरंट्याल यांची शेरेबाजी, अब तक छप्पन्न म्हणत उच्चारला क्रमांक

कैलास गोरंट्याल यांची शेरेबाजी, अब तक छप्पन्न म्हणत उच्चारला क्रमांक

Subscribe

विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बहुमत चाचणी झाली. यावेळी यावेळी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरेबाजी सुरु केली.

विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बहुमत चाचणी झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी प्रत्येक आमदाराला अनुक्रमे नाव आणि सहमती क्रमांक घेण्याची सूचना केली. शिंदेसेना आणि भाजपच्या आमदारांची गणती झाल्यावर महाविकसा आघाडी सरकारच्या बाजूच्या आमदारांची गणती सुरू होती. यावेळी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरेबाजी सुरु केली. यावेळी त्यांनी आपला नंबर सांगताना अब तक छप्पन्न …असा डायलॉगदेखील मारला. त्यामुळे चाचणीवेळी सभागृहात उपस्थित असलेल्यांमध्ये हशा पिकला.

विधानसभेतील कर्मचारी कैलास गोरंट्याल यांच्या टेबलजवळ मतमोजणीसाठी आले असता, स्वतःचा क्रमांक न उच्चारता, बोलणे सुरु केले. ते म्हणाले, शेर बोला तो मेरे पिछे ईडी लग जाएगी… राजकारण में साम दाम दंड भेद ये चिजे होती है… लेकिन आज कल… ईडी इन्कम टॅक्स राज्यपाल जरूरी है…’ कैलास गोरंट्याल यांनी बहुमत चाचणीवेळी अचानक शेरेबाजी सुरु केली, यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना केवळ हेड काउंट होईल, अशा सूचना केल्या. गोरंट्याल यांच्या शेरेबाजीमुळे सभागृहात काही क्षण मोठा गोंधळ माजला. तरीही त्यांनी शेर पूर्ण केला. त्यानंतरही ते नाव आणि नंबर उच्चारत नव्हे तेव्हा अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना त्यांना सोडून पुढे नोंदणी सुरु करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वीच कैलास गोरंट्याल यांनी आणखी एक टोला हाणला… स्वतःचे नाव उच्चारत त्यांचा 56 हा क्रमांक उच्चारताना, अब तक छप्पन्न, असा उल्लेख केला.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिंकला विश्वासदर्शक ठराव –

वसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात ९९ जणांची मतदान केले. दरम्यान, विधानसभेच्या बहुमत चाचणीत आज २० आमदार गैरहजर होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -