घरमहाराष्ट्रडी. एस. कुलकर्णी यांचे भाऊ मकरंदला अटक

डी. एस. कुलकर्णी यांचे भाऊ मकरंदला अटक

Subscribe

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. सुमारे अडीच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची किमान २३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कुलकर्णी बंधूंवर आहे. डीएसके कंपनीत मकरंद कुलकर्णी हे प्रवर्तक आहेत. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. पोलीस मकरंद कुलकर्णी यांचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. पण ते सापडत नसल्यामुळे त्यांच्या विरोधात ‘लुकआऊट नोटीस’ काढण्यात आली होती. अखेर आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अमेरिकेला पळून जात असताना त्यांना पकडण्यात आले. पुणे पोलिसांचे पथक त्यांना घेऊन जाण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

- Advertisement -

यापूर्वीच डीएसके घोटाळ्याप्रकरणी डीएसके समूहाची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या घोट्याळ्यावर कारवाई सुरु आहे. या घोटाळ्याप्रकरणी डीएसके कंपनीचे सर्वेसर्वा डी. एस. कुलकर्णी यांना पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली होती. त्यांना येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले होते. हा घोटाळा तब्बल ३००० कोटी रुपयांचा आहे. या घोटाळ्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी महाराष्ट्र बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही अटक केली होती. पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांनी आठ कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. त्यामुळे गुंतणूकदरांना पश्चातापराला सामोरे जावे लागत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -