घरमहाराष्ट्रमला मुख्यमंत्री करा; संभाजीराजे छत्रपतींकडून पुनरुच्चार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मला मुख्यमंत्री करा; संभाजीराजे छत्रपतींकडून पुनरुच्चार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Subscribe

कोल्हापूर : सारथीच्या प्रश्नांसाठी कोल्हापुरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनस्थळी जाऊन संभाजीराजे छत्रपती यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर गंमतीत म्हटलं की, मला मुख्यमंत्री करा, तुमचे प्रश्न चुटकीत संपवतो. संभाजीराजे छत्रपती यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे. (Make me Chief Minister A reiteration by Sambhajiraje Chhatrapati sparks discussions in political circles kolhapur)

हेही वाचा – मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली, संजय राऊतांची गाडी; नितेश राणेंनी सांगितलं कारण

- Advertisement -

सारथी संशोधन फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, तसेच पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देऊन नुकसान टाळावं, यांसारख्या मागण्यांसाठी फेलोशिप विद्यार्थी तसेच सारथी कृती समितीच्या कोल्हापूर विभागाच्या प्राध्यापकाकडून ऐन दिवाळी कोल्हापूरात आंदोलन सुरू आहे. रविवारी (12 नोव्हेंबर) संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. तसेच आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही विद्यार्थ्यांनी केली.

मला मुख्यमंत्री करा, तुमचे प्रश्न चुटकीत सोडवतो

विद्यार्थ्यांच्या या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी गंमतीत म्हणाले की, समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, तुमचे प्रश्न चुटकीत सोडवतो. संभाजीराजे छत्रपतींचा या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरवठा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Beed burning : ऐन दिवाळीत कथित मराठा बांधवाची पोलिसांकडून धरपकड; 181 जणांची दिवाळी जेलमध्ये

संभाजीराजेंकडून वक्तव्याचा पुनरुच्चार

दरम्यान, मला मुख्यमंत्री करा, चुटकीत प्रश्न सोडवतो. हे वक्तव्य करण्याची संभाजीराजे छत्रपतींची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत असेच वक्तव्य केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -