Homeमहाराष्ट्रSanjay Raut: 'मी बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही...'; राऊत संतापले, म्हणाले, त्यात गुन्हा कसला?

Sanjay Raut: ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही…’; राऊत संतापले, म्हणाले, त्यात गुन्हा कसला?

Subscribe

दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या सुनावणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मालेगाव न्यायालयात हजर झाले होते. यावेळी त्यांनी सामंजस्याने तोडगा काढण्यास नकार दर्शवला.

मालेगाव: दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या सुनावणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मालेगाव न्यायालयात हजर झाले होते. यावेळी त्यांनी सामंजस्याने तोडगा काढण्यास नकार दर्शवला. राऊत म्हणाले की चोराला चोर म्हणण्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे. 178 कोटींचा हिशोब आम्ही मागितला तर त्यात गुन्हा कसला? असं म्हणत राऊतांनी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे कधीही गुडघे टेकणार नाही, असं म्हटलं. आता या प्रकरणी 3 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. (Malegaon I am Balasaheb Thackeray Shiv Sainik Sanjay Raut got angry and said, what is the crime in that Dada Bhuse)

राऊतांचा भुसेंवर आरोप काय?

मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून 178 कोटी रुपये गोळा केले, त्याचा हिशोब द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यावरून दादा भुसे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याच प्रकरणी आज मालेगाव कोर्टात सुनावणी पार पडली.

राऊत काय म्हणाले?

तक्रारदार आणि आरोपी यांनी लोकअदालतीत बसून खटला मिटवावा असं कोर्टाचं म्हणणं आहे. पण चोराला चोर म्हणण्याचा अधिकार संविधानाने मला दिला आहे. चोराला महात्मा मी म्हणू शकत नाही, तो घटनेचा अपमान होईल. तुम्ही अद्वैय हिरेंना तुरुंगात टाकता मग दादा भुसेंचा 178 कोटींचा घोटाळा असताना त्यांना अटक का केली जात नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

राऊत म्हणाले की, 178 कोटींचा हिशोब मागितला तर आमच्यावर गुन्हा दाखल करतात. प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का? मला अधिकार आहे जनतेच्यावतीने प्रश्न विचारण्याचा. ज्यांचे पैसे घेतले आहेत भुसेंनी ती लोक रस्त्यावर उतरली आहेत. या घोटाळ्यासंदर्भात अनेक वृत्तपत्रांतही आलं होतं तसंच हा मुद्दा विधानसभेतही आला होता.

राऊत म्हणाले, भष्ट्राचाराविरोधात लढण्यासाठी जर माझ्यावर खटला भरला जात असेल तर तेही चालेल. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी कधीही गुडघे टेकले नाहीत, माफी मागितली नाही. ईडीला ही कधी घाबरलो नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा: Ajit Pawar Vs. Awhad : …आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवा, जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना आव्हान )