घरताज्या घडामोडीमलिक, देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारणे हा भाजपासाठी शुभसंकेत : आशीष शेलार

मलिक, देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारणे हा भाजपासाठी शुभसंकेत : आशीष शेलार

Subscribe

नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारणे हा भाजपच्या विजयासाठी शुभसंकेत असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आशीष शेलार यांनी दिली आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारणे हा भाजपच्या विजयासाठी शुभसंकेत असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आशीष शेलार यांनी दिली आहे. ‘या निकालानंतर विजयासाठी ठरणारा कोटा आणि त्याची गणिते काय असतील हे पाहता येईल. मात्र सध्यातरी हा शुभसंकेतच आहे.भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीच्या काळजीला प्राधान्य असेल. त्यांच्या प्रकृतीचा विचार करुनच निर्णय होईल.पण सध्या तरी ते मतदानाला येतील’, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. (Malik Deshmukh denying permission to vote is auspicious for BJP says Ashish Shelar)

मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान (legislative council elections) करण्याची परवानगी नाकारलीय. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन आमदार मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी नाकारली

मी विधिमंडळात येणारच: एकनाथ खडसे

- Advertisement -

‘मी विधिमंडळात येऊच नये असा काहींचा प्रयत्न होता. कारण मी तिथे येऊन बोललो तर काहींना अडचणीचे ठरणार आहे. मात्र पक्षाने मला संधी दिली आहे.मी विधिमंडळात परत येणारच’, असा विश्वास विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

‘राज्यसभा निवडणुकीत वेगळे गणित होते.भाजपकडे तेव्हा जास्तीची मते होती.मात्र आता शिवसेना वगळता कोणत्याही पक्षाकडे अतिरिक्तची मते नाहीत.त्यामुळे भाजपसाठी निवडणुकीचे गणित सोपे नाही. या निवडणुकीत आघाडीचेच उमेदवार निवडून येतील’, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.


हेही वाचा – काँग्रेसचं भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावासाठी नौटंकी आंदोलन, भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -