कॉंग्रेसच्या बळकटीसाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी

कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. आगामी काळात कॉंग्रसेला आणखी बळकटी देण्यात सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशातच मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी पक्षातील सर्व स्तरांतील संघटनात्मक जबाबदारी बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात कॉंग्रेसला आणखी बळकटी देण्यात सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशातच मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी पक्षातील सर्व स्तरांतील संघटनात्मक जबाबदारीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्षातील जबाबदारी पूर्ण करू न शकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदे सोडावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर स्थापन केलेल्या काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत खर्गे बोलत होते. या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यांतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. (Mallikarjun Kharge Congress Organization Meeting Workers)

‘सरचिटणीस आणि राज्यांचे प्रभारी या नात्याने तुम्ही तुमच्या जबाबदारीनुसार महिन्यातून किमान १० दिवस संबंधित भागांचा दौरा करता का, याचे तुम्हाला आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्यांना भेट देऊन पक्षनेत्यांशी चर्चा करताहेत का? स्थानिक समस्या, मुद्दे जाणून घेत आहेत का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.

त्याचप्रमाणे, राज्यांतील पक्षाचे सरचिटणीस आणि प्रभारी यांनी प्रथम स्वतःची जबाबदारी निश्‍चित करून जनआंदोलनाच्या संदर्भात ३० ते ९० दिवसांत रूपरेषा तयार करावी. तसेच सन २०२४ पूर्वी ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार असून, तेथील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नियोजनाचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले.

याशिवाय, ‘संघटनेत वरपासून खालपर्यंत जबाबदारी निश्चित असायला हवी. आपल्या पक्षाची संघटना मजबूत असेल, उत्तरदायी असेल, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत असेल, तरच आपण निवडणुका जिंकून देशवासीयांची सेवा करू शकू. आपल्या पक्षात अनेक अत्यंत जबाबदार व्यक्ती असून ते आपले कर्तव्य चोख पार पाडत आहेत. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांचा असा समज झाला आहे की, आपल्या बेजबाबदारपणाकडे कोणाचेही लक्ष नसेल. पण हे योग्य नाही आणि मान्य करणारेही नाही. जे जबाबदारी पार पाडू शकत नाहीत, त्यांना नव्या सहकाऱ्यांना संधी द्यावीच लागेल’, असे खर्गे यांनी या बैठकीत बजावले.


हेही वाचा – Gujrat Election 2022 : आज अखेरचा टप्पा; नरेंद्र मोदी, अमित शाह करणार मतदान