घरताज्या घडामोडीकरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मॉल्स बंद राहणार - आरोग्यमंत्री

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मॉल्स बंद राहणार – आरोग्यमंत्री

Subscribe

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत जाहिर केलं.

राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे राज्य सरकारने खबरदारी म्हणून शाळा, कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता मॉल्स देखील बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला करोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. ३० मार्चपर्यंत मॉल्स बंद राहतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


हेही वाचा – राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

- Advertisement -

सार्वजनिक गर्दी टाळण्यासाठी मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन तसेच बससेवा या अत्यावश्यक सेवा आहेत, त्यामळे त्या बंद करता येणार नाहीत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. ‘वर्क फ्रॉम होम’ ज्या कंपन्यांना शक्य आहे ते त्यांनी अंमलात आणावे असेही निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. चित्रपटगृहे किंवा मॉल्स सुरु ठेवले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. तसेच लग्नसमारंभाच्या ठिकाणी कमी गर्दी करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान, शाळा, कॉलेजेसना ३१ मार्च पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. तर दहावीच्या आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा वेळेपत्रकानूसार होतील, असे राज्य सरकारने घोषित केले आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -