घरमहाराष्ट्रबुलढाण्यात वैद्यकीय प्रवेशासाठीच्या NEET परीक्षेत घोटाळा; केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून सारवासारव

बुलढाण्यात वैद्यकीय प्रवेशासाठीच्या NEET परीक्षेत घोटाळा; केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून सारवासारव

Subscribe

बुलढाण्यातील केंद्रावर वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत घोटाळा झाल्याची घटना घडली आहे. ऑनलाईन सुरु असलेल्या नीट परीक्षेची उत्तर पत्रिका परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर तब्बल एक तास परीक्षार्थीकडे
असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. ही उत्तर पत्रिका परत देतानाचा विद्यार्थी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बुलढाण्यातील जांभरुळ तोमई इंग्लिश स्कुल येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. यासर्व प्रकरणानंतर परीक्षा केंद्रवर असलेल्या अधिकाऱ्यांनी उत्तर पत्रिका केंद्रात जमा करुन घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

नीट परीक्षेदरम्यान झालेला हा गैरप्रकार अनेक उत्तर पत्रिकांबाबत झाला तर नाही ना? असा संशय निर्माण होत आहे. तसेच नीट परीक्षेतील गुण वाढविण्यासाठी हा गैरप्रकार झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परीर्थ्यांना पहिली नीट परीक्षा देणं बंधनकारक आहे. त्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता येतं. या परीक्षेत मेरिट गुण प्राप्त करणाऱ्यांना सरकारी कोट्यतून निशुल्क आणि काही शुल्क भरुन वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता येते. ही नीट परीक्षा केंद्र सरकारकडून घेतली जाते. वैद्यकीय शिक्षणासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने परीक्षा केंद्रांवर कडक नियमांचे पालन केले जाते. या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना बंधनकारक आहे.

रविवारी १२ सप्टेंबर रोजी देशातील विविध राज्यांतील केंद्रांवर एकाच दिवशी एकाच वेळी नीटची ऑफलाईन परीक्षा घेण्यात आलीय. बुलढाण्या जिल्ह्यातही या परीक्षा सुरु होत्या. या सदर परीक्षा केंद्रांवर कडक नियमावली जाहीर करुन कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून दक्षता ठेवण्याचे आदेश देणयात आले. मात्र बुलढाण्यातील जांभरुळ येथील तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावरील उपस्थित केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी सारवासारव करून तब्बल एका तासानंतर उत्तर पत्रिका परीक्षा केंद्रावर जमा करुन घेतली.

- Advertisement -

हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. तब्बल एक तास नीट परीक्षेची उत्तर पत्रिका बाहेर असल्यामुळे असा प्रकार अशा अनेक उत्तर पत्रिकेबाबत झाला तर नाही ना? असा संशय निर्माण होत आहे. या प्रकाराबाबत विचारल्यावर, “परीक्षा संपल्यावर एका चांडोलच्या एका परीक्षार्थ्याच्या चुकीनं जी शाळेत जमा असते ती उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी सोबत नेली होती. ती त्याच्याकडून जमा करण्यात आली आहे. जी कॉपी जमा करण्यात आली आहे. ती नीटची मूळ उत्तरपत्रिका नव्हती तर उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी होती.” अशी माहिती तोमई इंग्लिश शाळेचे परीक्षा केंद्र प्रमुख अजय जवंजाळ यांनी दिली आहे.


करुणा शर्माचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम १८ सप्टेंबरपर्यंत वाढला


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -