घरमहाराष्ट्रमाळशेज घाटावरील दरड हटवण्याचे काम सुरु

माळशेज घाटावरील दरड हटवण्याचे काम सुरु

Subscribe

माळशेज घाटात बुधवारी दरड कोसळल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून सध्या दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

माळशेज घाटात बुधवारी रात्री दरड कोसळण्याची घटना घडली होती. यामुळे याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दरड कोसळल्यानंतर वाहतूक एकेरी मार्गाने सुरु होती. सध्या ही दरड हटवण्याचे काम सुरु असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. माळशेज घाटातील बोगद्याजवळ ही दरड कोसळली असून पहाटेपासून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

पर्यटकांनो सावधान

माळशेज घाटात बुधवारी रात्री दरड कोसळल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तसेच पावसाळा म्हटला की माळशेज घाटात पर्यटकांची मोठी गर्दी असते. दरम्यान, अशावेळी जर दरड कोसळण्याची घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या यंदाच्या पावसाळ्यात माळशेजला जायचे तुमचे जर प्लॅनिंग असेल तर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाऊस होऊनही मराठवाड्याला चिंता नाशिकची

हेही वाचा – पालघरमध्ये मुसळधार पाऊस; केळवे स्थानकात पाणी साचल्याने १३ ट्रेन्स रद्द

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -