Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी केंद्र सरकारला प्लास्टर करा नाही तर देश बरबाद होईल; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

केंद्र सरकारला प्लास्टर करा नाही तर देश बरबाद होईल; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

मी माझा फोनच प्लास्टर केला आहे तसेच केंद्रातील मोदी सरकारला प्लास्टर केलं पाहिजे.

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेगॅसस फोन टॅपिंग प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, मी माझ्या फोनच्या कॅमेराला झाकले आहे कारण हॅकिंग करुन त्यांची हेरगिरी केली जाऊ नये. तसेच त्यांनी म्हटलं आहे की, मी माझा फोनच प्लास्टर केला आहे तसेच केंद्रातील मोदी सरकारला प्लास्टर केलं पाहिजे. पेगॅसस फोन टॅपिंग हे भयानक प्रकरण आहे कारण मी कोणाशीच बोलू शकत नाही. केंद्र सरकार हेरगिरीसाठी अधिक पैसा खर्च करत आहे. यामुळे याच्यापासून वाचण्यासाठी मोबाईल प्लास्टर करुन टाकला आहे.

केंद्र सरकारलाही प्लास्टर करुन टाकले पाहिजे अन्यथा देश बरबाद होईल. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, पेगॅसस फोन टॅपिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला पाहिजे. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हटलं आहे की, केंद्र सरकारने पेगॅसस स्पायवेयरच्या मदतीने लोकांच्या फोनमध्ये हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. यापासून वाचण्यासाठी फोनला प्लास्टर केलं आहे. तसेच मोबाईल दाखवत कॅमेरावर टेप लावून झाकला असल्याचेही त्यांनी दाखवले. ऑडिओ, व्हिडिओसह केंद्र सरकार प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवत आहे.

- Advertisement -

शरद पवारांशीही बोलू शकत नाही

ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री, ओडिसाचे मुख्यमंत्री, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही फोनवर बोलू शकत नाही. पेगॅसस भयानक आहे. लोकांना त्रास दिला जात आहे. देशात स्पायगिरी सुरु आहे. मंत्री आणि न्यायाधीशांचे फोन देखील टॅफ करण्यात येत आहे. सरकारने लोकशाही नष्ट केली आहे. लोकशाही व्यवस्थेएवजी केंद्र सरकारने या देशाला पाळत ठेवणारा देश बनवले आहे. पेगॅससने इलेक्शन कमिशन, न्यायालय, मीडिया आणि मंत्र्यांवर हेरगिरी करण्यात आली असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

- Advertisement -