घरताज्या घडामोडीMamata Banerjee Mumbai Visit : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल, कसा असेल...

Mamata Banerjee Mumbai Visit : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल, कसा असेल दोन दिवसीय दौरा?

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांचा दोन दिवसीय दौरा असून कोलकातामधून त्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुंबईत दाखल होताच सर्वात पहिले ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे. या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये ममता बॅनर्जी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी भेट घेणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही. परंतु पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ममता बॅनर्जी संध्याकाळी ७.३० वाजता भेट देणार आहेत.

- Advertisement -

शरद पवार यांची घेणार भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या बुधवारी भेट घेणार आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजता शरद पवार यांच्या सिल्ह्वर ओकवर त्या भेट देणार आहेत. त्यानंतर ममता दीदी १ डिसेंबर रोजी मुंबईतल्या उद्योगपतींना भेटतील आणि पुढच्या एप्रिल महिन्यातील ७ तारखेला होणाऱ्या ग्लोबल बिझनेस समितीमध्ये उद्योगपतिंना आमंत्रण देण्यात येणार आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसकडून विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक

ममता बॅनर्जी यांच्या मु्ंबईतील दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्या शिवसेना नेते आणि शरद पवार यांच्यासोबत भेट घेणार आहेत. कारण तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसकडून विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. ज्यामध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या संबंध चांगलं नसल्याचं दिसून आलंय. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई दौऱ्यात ममता बनर्जी काँग्रेसच्या नेत्यांशी भेटीगाठी करणार नाहीयेत.

- Advertisement -

संजय राऊत यांच्या मुलीच्या स्वागत समारंभालाही उपस्थित राहणार

ममता बॅनर्जींना तृणमूल पक्ष हा गोव्यापर्यंत पसरवायचा आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या बाहेरील राज्यांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी एक प्रबळ शक्ती बनवली जात आहे. बॅनर्जी म्हणाल्या की, देशातील सर्वात जास्त विरोधी नेत्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांची भेट न घेता त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्याशी भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरे ममता बॅनर्जी यांना एका मुंबईतील हॉटेलमध्ये सायंकाळी ७.३० वाजता भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या मुलीच्या स्वागत समारंभालाही त्या उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा: Piaggio: बारामती प्लान्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी बनवली पहिली इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर ऑटो


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -