घरमहाराष्ट्रघटस्फोटित महिलांना लाखोंचा गंडा

घटस्फोटित महिलांना लाखोंचा गंडा

Subscribe

सात घटस्फोटित महिलांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या लखोबा लोखंडेला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. महेश कुलकर्णी असं या फसवणूक करणाऱ्या महिलेचं नाव आहे.

अपने पास बहोत पैसा है! मेरा खूद का बिझनेस है! अशा एक ना अनेक भूलथापा मारून घटस्फोटित महिलांना लाखोंचं गंडा घालणं आणि पैसा उकळणं हा महेश कुलकर्णीचा धंदा. प्रेमाच्या आणभाका घेणं आणि पैसे घेऊन फरार होणं हा महेश कुलकर्णीचा धंदा. पण, पोलिसांनी अखेर महेश कुलकर्णींला जेरबंद केलेचं. या महेश कुलकर्णीनं आत्तापर्यंत सात महिलांना जवळपास १३.५० लाखांचा गंडा घातला आहे. मुंबईचा रहिवाशी असलेल्या महेश कुलकर्णीनं लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी केली. आपल्या प्रोफाईलमध्ये त्यानं हॉटेल व्यवसायिक आणि गोव्यातील नामांकित हॉटेलमध्ये भागीदार असल्याचं नमूद केले होते. पण, पैसे उकळण्यासाठी महेश घटस्फोटित महिलांची प्रोफाईल पाहायाचा. त्यानंतर त्यांच्यांशी ओळख वाढवून त्यांच्याकडून पैसे घेऊन पसार व्हायचा.

गोव्यात राहणाऱ्या एका महिलेला देखील त्यानं गोव्यात कॅफे आणि हॉटेल असल्याचं सांगितले. त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महेशनं त्या महिलेकडून ८ लाख रूपये उकळले. पण, चौकशीअंती महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशा प्रकारे महेशनं सात महिलांची फसवणूक केली होती. त्यातील एका महिलेनं ई – मेलवरून पोलिसांना तक्रार देखील दाखल केली होती.

- Advertisement -

बंगळूरूमध्ये देखील एका महिलेला महेशनं उद्योजक असल्याचं सांगत तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर तिची भेट घेतली. यावेळी सतत विमान प्रवास करून कंटाळा आल्याची बतावणी करत महिलेची गाडी घेऊन मीटींगला जाण्याचं निमित्त देखील केलं. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेनं आपली कार महेशला दिली. पण, गाडी घेऊन मुंबईला आल्यानंतर महेशनं संबंधित महिलेचे कॉल घेणं बंद केलं. महेश कुलकर्णी मुंबईमध्ये असल्याचे समजल्यानंतर महिलेनं मुंबई पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर व्यवसायामध्ये २५ लाखांची गुंतवणूक करायची आहे असे सांगत तिनं मुंबई विमानतळावर महेशला बोलावले. त्यानंतर महेश पोलिसांच्या ताब्यात सापडला.

महेशला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी फसवणूक झालेले्या महिलांशी देखील संपर्क साधला आहे. महेशच्या मोबाईलमध्ये सर्वांची नावं ही ताई, आई, माय लव्ह या नावानं सेव्ह होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -