घरमहाराष्ट्ररेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक

Subscribe

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक करणार्‍या एका फरार भामट्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. संतोष जुमनिक असे या २५ वर्षांच्या भामट्याचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोषने आतापर्यंत आठ तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २५ लाख रुपये उकाळल्याचे उघडकीस आले आहे. त्यात अकोला, जळगाव आणि बुलढाण्यातील काही तरुणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संतोष आडे हा तरुण मूळचा अकोला जिल्ह्याचा रहिवाशी असून सध्या तो कल्याण येथे त्याच्या कुटुंबियासोबत राहतो. इंजिनिअरचे शिक्षण घेत असलेला संतोष हा नोकरीच्या प्रयत्नात होता. अकोला येथे असताना त्याची भेट त्याचा मित्र राहुल कोकरे याच्याशी झाली. या भेटीत त्याने संतोष जुमनिक हा तरुण त्याच्यासाठी रेल्वेत प्रयत्न करीत असून त्याला या कामी तीन लाख रुपये दिले. त्यानंतर त्याने पीडित तरुणाची ओळख संतोष जुमनिक याच्याशी करुन दिली. त्यालाही त्याने रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून नऊ लाख रुपये घेतले. काही दिवसांत त्याला रेल्वेत नोकरीचे नियुक्तीपत्रे मिळेल असे सांगण्यात आले.

- Advertisement -

ठरल्याप्रमाणे त्याने त्याला काही महिन्यांनी रेल्वेचे नियुक्तीपत्र दिले. मात्र ते पत्र बोगस असल्याचे रेल्वेत चौकशी केल्यानंतर त्याला समजले. त्यानंतर त्याने गुन्हे शाखेत धाव घेऊन तिथे संतोष जुमनिक विरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी बोगस दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच संतोष जुमनिकचा पोलिसांनी शोध सुरु केला. ही शोधमेाहीम सुरु असातना त्याला अकोला येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -