घरमहाराष्ट्रधुळ्यातून नशेच्या 1000 गोळ्या, 86 गुंगीच्या औषधांच्या बाटल्यांसह तरुणाला अटक

धुळ्यातून नशेच्या 1000 गोळ्या, 86 गुंगीच्या औषधांच्या बाटल्यांसह तरुणाला अटक

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात अवैध गुंगीकारक औषधांचा व्यवसाय करणारी टोळी सक्रिय झाली आहे. याच टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी धुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. यात आज धुळे शहरातील 80 फूट रस्त्यालगतच्या नटराज टॉकीज परिसरातून तब्बल 100 नशेच्या गोळ्या आणि 86 गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह तरुणाला आझाद नगर पोलिसांनी अटक केली आहे.

धुळे शहरातील 80 फूटी रस्त्यावर एक तरुण बेकायदेशीरपणे अवैध्य नशेच्या गोळ्या आणि औषधांच्या बाटल्या विकत असल्याची गुप्त माहिती आझाद नगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आझाद नगर पोलिसांना रात्रीच्या सुमारास नटराज टाकी परिसरातील एका पत्र्याच्या कंपाऊंडच्या आडोशाला एक तरुण संशयास्पदरित्या उभा असलेला दिसला. यावेळी आझाद नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी तरुण पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याता प्रयत्न फसला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गणेश सोनार असे या आरोपीचे नाव असून तो धुळे शहरातील काझी प्लॉटमध्ये राहणार आहे. या संशयित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर आझाद नगर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

या संशयित तरुणाकडून तब्बल 1070 नशेच्या गोळ्या आणि मानवी मेंदूवर विपरित परिणाम करणाऱ्या 86 गुंगीकारक औषधांच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. या तरुणाने ही अवैध गुंगीकारक औषधांचा साठा आणला कुठून होता आणि त्यासोबत आणखी कोणी आहेत का? याचा तपास धुळे पोलीस करीत आहेत.


PMGKAY अंतर्गत आता डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत रेशन; 80 कोटींना लोकांना होणार फायदा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -