घरमहाराष्ट्रतेरा तरुणींना फसवणारा 'लखोबा लोखंडे' गजाआड

तेरा तरुणींना फसवणारा ‘लखोबा लोखंडे’ गजाआड

Subscribe

सध्या विवाह नोंदणी संस्था ज्या संख्येने कार्यरत आहेत, तितक्याच संख्येने ऑनलाइन मॅरेज ब्युरो चालवणार्‍या वेबसाईट्सही आहेत. मात्र घरबसल्या शेकडो स्थळी पाहता येतात, म्हणून लाखोंच्या संख्येने तरुण-तरुणी या ऑनलाइन मॅरेज ब्युरो साइट्सकडेआकर्षित झाल्या आहेत.

सध्या विवाह नोंदणी संस्था ज्या संख्येने कार्यरत आहेत, तितक्याच संख्येने ऑनलाइन मॅरेज ब्युरो चालवणार्‍या वेबसाईट्सही आहेत. मात्र घरबसल्या शेकडो स्थळी पाहता येतात, म्हणून लाखोंच्या संख्येने तरुण-तरुणी या ऑनलाइन मॅरेज ब्युरो साइट्सकडेआकर्षित झाल्या आहेत. यावर अपलोड झालेले सर्वच प्रोफाइल खरे असतीलच, याची शाश्वती देता येणार नाही. म्हणून मुलींनी अशा साइट्सवरून संपर्क साधणार्‍यांशी पुढील बोलणी करण्याआधी सावधानता बाळगण्याची गरज बनली आहे.

कारण त्यातील एखादा तुम्हाला विवाहासाठी मागणी करेल, तुमच्याशी बोलणी करेल, मैत्री करेल आणि तुमच्याकडून लाखो रुपये घेऊन पळूनही जाईल. अशा प्रकारे विवाहासाठी जमवलेली तुमची पुंजी चोरणारे लखोबा लोखंडे या अशा साइट्सवर सर्रासपणे वावरत आहेत. असाच एक तब्बल ९ मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळून गेलेला लखोबा लोखंडेला हडपसर पोलिसांनी गजाआड केला आहे. कृष्णा चंद्रसेन देवकाते (वय-३० रा. पुराणिक सिटी,मुंबई )असे फसवणूक करणार्‍या या तोतया नवरदेवाचे नाव आहे.याबाबतची माहिती अशी की, देवकाते याने प्रज्वल देशमुख या नावाने पुणे,ठाणे,नवी मुंबई शहरात जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर नावनोंदणी केली होती. त्याचे प्रोफाइल पाहून हडपसर येथील एका तरुणीने संपर्क साधला.

- Advertisement -

देवकाते याने तिचा विश्वास संपादित करून वेळोवेळी वेगवेगळी कारणे देत तिच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. यानंतर संबंधित तरुणीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाइल बंद लागला. तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ठाणे येथे आरोपी देवकाते याला सापळा रचून अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोडस ऑपरेंडी वापरायचा

कृष्णा देवकाते हा लखोबा लोखंडे मुलींना फसवण्यासाठी एकच मोडस ऑपरेंडी वापरायचा. त्यासाठी त्याने बनावट नावाने स्वतःचे प्रोफाइल बनवले. त्या प्रोफाइलवरून वेगवेगळ्या मुलींची विचारपूस करायचा. त्यांची माहिती घेऊन संपर्क क्रमांक घ्यायचा. फोनवरून मैत्रीपूर्ण संवाद साधून विश्वासात घ्यायचा आणि पुढे ऑनलाइन अर्थव्यवहार करण्यास भाग पाडायचा. संबंधित मुलींना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडायचा. पैसे मिळताच लगेचच संपर्क तोडून टाकायचा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -