घरताज्या घडामोडीउद्धाटनाआधीच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका; परवानगी नसताना प्रवास सुरू

उद्धाटनाआधीच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका; परवानगी नसताना प्रवास सुरू

Subscribe

उद्धाटनापूर्वीच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. रविवारी ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच, तीन जण जखमी झाले.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग उद्धाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या समृद्धी महामार्गामुळे (samruddhi expressway) नागपूर ते मुंबई (mumbai nagpur samruddhi expressway) प्रवास जलद होणार आहे. मात्र उद्धाटनापूर्वीच या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. रविवारी ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच, तीन जण जखमी झाले. (man died three others injuries in car accident on mumbai nagpur samruddhi expressway)

विशेष म्हणजे हा महामार्ग अद्याप वाहनांसाठी खुला झाला नसतानाही येथ अपघाताची (Accident) संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहना चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सुरूवातील २ मे रोजी या महामार्गाचे उद्धाटन होणार होते. परंतु, बांधकाम बाकी असल्याने उद्धाटन पुढे ढकलले.

- Advertisement -

मुसळधार पावसामुळे अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच, अनेक चालक परवानगी नसताना या एक्स्प्रेसवेचा वापर करतात. या अपघातात बळीराम खोकले (४५) असे मृताचे नाव आहे. खोकले यांच्यासोबत अन्य दोघेजण प्रवास करत होते. चंद्रकांत साबळे (४५) आणि सुनील लिंबेकर (४३) हे जखमींची नाव आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – समृद्धी महामार्गालगतच्या सीएनजी गॅस पाईपलाईनचा ‘इतक्या’ जिल्ह्यांना होणार फायदा

बळीराम खोकले हे बुलढाण्याचे (Buldhana) राहणारे रहिवाशी आहे. बळीराम खोकले याच्या गाडीला झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, जालना शहराजवळ रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. औरंगाबादहून आपल्या गावी परतत होते. सुरुवातीला मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत असल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र तसं असलं तरी नंतर गाडीचा मागचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचे समोर आलं आहे.

अपघातग्रस्त कार

हा अपघात इतका भीषण होता की, ही अपघातग्रस्त कार महामार्गाच्या मध्यभागी दुभाजक बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. अपघाताची धडक एवढी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आणि चालकाच्या शेजारी बसलेले खोकले हे गंभीर जखमी झाले. कारमधील अन्य दोन प्रवासी साबळे आणि लिंबेकर हेही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा चालक योगेश सांगळे (२४) हा किरकोळ जखमी झाला आहे.

अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी खोकले यांना उपचारादरम्यान डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.

समृद्धी द्रुतगती मार्ग, जो मुंबई आणि नागपूर दरम्यानचे ७०१ किमी अंतर कापेल, हा देशातील सर्वात वेगवान द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ५५,००० कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या महामार्गाच्या बांधकामाचे काम करत आहे.

या महामार्गाचा पहिला टप्पा, नागपूर ते वाशिममधील शेलू बाजार दरम्यानचा २०१ किमीचा पट्टा, या वर्षी २ मे मध्ये लोकांसाठी खुला करण्यात येणार होता. दरम्यान नागपूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या वन्यजीव ओव्हरपास, ज्यावर वन्यप्राण्यांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी रस्त्यावर बांधकाम सुरू होते, त्याला तडे गेले आणि नुकसान झाले. एमएसआरडीसीने आता त्याच्या जागी पूर्णपणे नवीन संरचना उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे प्रकल्पाला विलंब झाला आहे.


हेही वाचा – पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी, नरेंद्र मोदींचे वारकऱ्यांना आश्वासन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -