घरताज्या घडामोडीपुणे : गॅस गीझरमुळे झाला तरूणाचा मृत्यू

पुणे : गॅस गीझरमुळे झाला तरूणाचा मृत्यू

Subscribe

गॅस गीझरमुळे एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आंघोळ करताना बाथरूममध्ये गॅस गीझरमधून वायुगळती झाल्याने एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीचे एक घटना घडल्याचे समोर आले आहे. गॅस गिझरमुळे पुण्यात एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. रामराजे किशोर सकपाळ, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून चार दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

पुण्यात कोथरुड येथे मंगळवारी संध्याकाळी रामराजे सकपाळ हा आंघोळ करण्यासाठी गेला होता. मात्र, थोड्यावेळ्याने त्यांच्या घरामधून अचानक दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सकपाळ याच्या शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बाथरुममधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बाथरुमचा दरवाजा तोडला असता त्यावेळी रामराजे जमिनीवर पडलेला दिसला. तसेच रामराजेच्या बाथरुममध्ये एलपीजीवर चालणारा गिझर असून तो तिथल्या खिडक्या बंद असल्याचे आढळून आले. दरम्यान, गिझरमधून विषारी वायू गळती झाल्यामुळे रामराजे याचा गुदमरुन मृत्यू झाला असावा, अशी शक्यता कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी व्यक्त केली आहे. तसेच या तरुणाचे ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालानुसार रामराजे याचा गुदमरुन मृत्यू झाला असल्याची माहिती प्रतिभा जोशी यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबादमधील मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -