घरमहाराष्ट्रतरुणीला आयटम म्हणणं तरुणाच्या अंगलट; कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा

तरुणीला आयटम म्हणणं तरुणाच्या अंगलट; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

Subscribe

अनेकदा आपण मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आपण मस्करीत आयटम नावाने हाक मारतो. मात्र अशाप्रकारे एका मुलीला आयटम म्हणणे तरुणाच्या अंगलट आलं आहे. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात मुंबईतील एका न्यायालयाने एका तरुणाला दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संबंधित तरुणावर एका मुलीला आयटम हाक मारत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, जेव्हा एखाद्या मुलीली उद्देशून आयटम हा शब्द वापरला जातो, हे मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईतील पोक्सो कोर्टाने 26 वर्षीय व्यावसायिकाला 16 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. आरोपीने 2015 मध्ये शाळेतून येणाऱ्या एका मुलीचे केस ओढत, क्या, आयटम कहाँ जा रही है? असं म्हटलं. यावर न्यायलयाने सांगितले की, आरोपी एका महिन्यापासून लैंगिक हेतूने मुलीचा पाठलाग केला होता.

- Advertisement -

आरोपीच्या चांगल्या वागणुकीमुळे माफीची याचिका फेटाळून लावत विशेष न्यायाधीश एसजे अन्सारी म्हणाले की, महिलांचे अन्यायकारक वागणुकीपासून वाचवण्यासाठी अशा गुन्ह्यांवर कठोरपणे कारवाई करणे आवश्यक आहे. अशा रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे. 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या व्यावसायिकावर पोक्सो कोर्टाने दोषी ठरवले. मुलीच्या पालकांना तरुणाने त्यांच्या मुलीसोबत केलेली मैत्री आवडत नसल्याने त्यांना याप्रकरणी अडकविण्यात आले होते. या अल्पवयीन मुलीला जुलै महिन्यात न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असलेल्या अल्पवयीन मुलीने सांगितले की, 14 जुलै रोजी 2015 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास शाळेत जात होती. यावेळी आरोपी त्यांच्या गल्लीत मित्रांसह बसला होता. जेव्हा दुपारी 2.15 च्या सुमारास ती शाळेतून येत होती तेव्हा आरोपी तिच्या मागे आला. तसेच त्याने तरुणीचे केस ओढत तिला आयटम असे म्हटले.

- Advertisement -

यावर पीडित मुलीने पुढे सांगितले की, जेव्हा आरोपीने माझ्यासोबत असे केले तेव्हा त्याला धक्का देत असे करु नकोस सांगितले, यानंतर आरोपीने शिवीगाळ करत मला हवे ते करेन असे म्हटले. अल्पवयीन मुलीने लगेच 100 नंबर डायल केला, यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आरोपींनी तिथून पळ काढला, यानंतर पीडित मुलीने वडिलांना घटनेची माहिती दिली.


वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायकांनी साकारली माँ कालीची मूर्ती; 4 हजार दिवे, 5 टन वाळूचा केला वापर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -