प्रियकरांनी काढला प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा; दगडाने ठेचून केली हत्या

पुण्यातील कोंढव्यात एका विवाहीत प्रेयसीच्या नवऱ्या खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

man killed his girlfriend's husband in pune
प्रियकरांनी काढला प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा; दगडाने ठेचून केली हत्या

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते, अशीच एक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढव्यात एका विवाहीत प्रेयसीच्या नवऱ्या खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रियकराला अटक केली आहे. याप्रकरणी सिद्धार्थ उर्फ धुमाळ मनोज शिरसवाल (२८) याला अटक करण्यात आली आहे. तर अजय दादू खुडे (३१), असे खून झालेल्याचे नाव आहे.

नेमके काय घडले?

कोंढव्यात पाण्याच्या टाकीजवळ गुरुवारी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी काही वेळातच त्याची ओळख पटविली. संबंधित तरुणाचे नाव अजय असून त्याच्या पत्नीचे सिद्धार्थ उर्फ धुमाळशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे सिद्धार्थने अजयचा खून केला असावा, असा पोलिसांना संशय येतो. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेतात. त्यावेळी सिद्धार्थ जांबूळकर कॅनोल लगत लपून बसला असल्याचे समजते. त्यानुसार पोलीस त्याला ताब्यात घेतात आणि त्याची कसून चौकशी करतात. त्यात आपणच अजयचा दगडाने ठेचून खून केल्याची कबूली देतो आणि आरोपीला अटक करण्यात येते.


हेही वाचा – व्यायाम करताना वृध्दाचा मृत्यू