घरताज्या घडामोडीधक्कादायक : मद्यपी भावाच्या त्रासाला कंटाळून धाकट्या भावाने केला दगडाने ठेचून खून

धक्कादायक : मद्यपी भावाच्या त्रासाला कंटाळून धाकट्या भावाने केला दगडाने ठेचून खून

Subscribe

दारू पिल्यानंतर घरात सतत त्रास देणाऱ्या भावाचा लहान भावाने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,  पोलिसांना मृतदेह पेठ रोडवरील नामको कँन्सर हॉस्पिटलच्यासमोर रस्त्यालगत आढळून आला आहे. संतोष सखाराम थोरे (४०, रा.मखमलाबाद) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष थोरेला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या आहारी गेला होता. तो दारू पिल्यानंतर पत्नीला त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. तरीही तो दारू पिल्यानंतर घरातील नातलगांना त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या लहान भावाने रागाच्या भरात त्याचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानेे एका संशयितास ताब्यात घेतले असून दुसरा संशयित फरार फरार झाला आहे.  पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -