घरमहाराष्ट्रदरोडा टाकून सख्या भावाच्याच घरात चोरी!

दरोडा टाकून सख्या भावाच्याच घरात चोरी!

Subscribe

शेतीच्या वादातून सख्या भावानेच भावाच्या घरी दरोडा टाकून चोरी केली आहे. शेतीच्या वादातील बदला घेण्यासाठी त्याने दरोडेखोरांना ८५०० रुपये दिले होते.

शेतीच्या वादातून सख्या भावानेच भावाच्या घरी दरोडा टाकून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. त्याने ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. याप्रकरणी भावासह त्याच्या ४ साथीदाराला शिर्डी पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान, एक आरोपी अजूनही फरार असल्याचे शिर्डी पोलीसांनी सांगितले आहे. पोलिसांनी आकाश बाळासाहेब गायकवाड, योगेश कोंडीराम खंडीझोड, प्रवीण रामदास खंडीझोड, अक्षय अशोक पारधे या चार आरोपींना अटक केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

२१ नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुनील मारुती पाचोरे आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा वाजवला. आपला अपघात झाल्याचे त्यांनी घराबाहेरुन सांगितले. या चोरट्यांनी घरातील लोकांकडून पाणी मागितले. त्यामुळे सुनील पाचोरेंनी दरवाजा उघडला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत घरातील लोकांना दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाण केली. या चोरट्यांनी दमदाटी करत ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेनंतर सुनील पाचोरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा शिर्डी पोलिसांनी कसून तपास केला. पोलिसांना गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहाता येथील आंबेडकर नगरमधील रहिवाशी आकाश बाळासाहेब गायकवाड याने त्याच्या साथीदारासह सदरचा गुन्हा केला आहे, अशी माहिती मिळाली. शिर्डी पोलीस तसेच श्रीरामपूर पोलीस पथकाने राहता येथील आंबेडकरनगर मध्ये जाऊन प्रथम आकाश यांस ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली.त्यास विश्वासात घेऊन तांत्रिक दृष्ट्या सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. दरम्यान, आरोपी बाळासाहेब मारुती पाचोरे याने सख्या भावाचा शेतीच्या वादातील बदला घेण्यासाठी इतर आरोपींना ८५०० रुपये दिले होते. दरम्यान गुन्ह्याचा कट करून गुन्हा कसा करायचा हेद्खील सांगण्यात आल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. याप्रकरणी पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -