Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र आईचे नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी मागितली लाच, मंडल अधिकारी अन् पंटर 'एसीबी'च्या जाळ्यात

आईचे नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी मागितली लाच, मंडल अधिकारी अन् पंटर ‘एसीबी’च्या जाळ्यात

Subscribe

नाशिक : नाशिकसह विभागात सातत्याने लाचखोरीच्या घटना घडत आहेत. मागील काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात मोठ मोठे मासे अडकले आहेत. काही दिवसातच नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा आकडा तब्बल 200 च्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया होत असूनही लाचखोर मात्र अत्यंत निर्ढावलेले असल्याचे बघायला मिळत आहे. याच आठवड्यात जीएसटी अधिकारी, पोलीस निरीक्षक अशा मोठ्या कारवाई झालेल्या असताना आता येवला तालुक्यात आईचे नाव सातबाऱ्यावर लावण्याच्या मोहबदल्यात लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे.

सातबार्‍यावर आईचे नाव लावण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच (bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, (anti corruption bureau) नाशिकच्या पथकाने मंडळ अधिकारी व खासगी व्यक्तीस अटक केली. (circle officer, Yeola Pandurang Koli) मंडल अधिकारी पांडुरंग हांडू कोळी (वय ५७, रा. सावरगांव, ता. येवला, जि. नाशिक), खासगी व्यक्ती विठोबा जयराम शिरसाठ (वय ३२, रा.ठाणगांव, ता. येवला, जि. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.

- Advertisement -

पांडुरंग कोळी वर्ग तीनचे मंडल अधिकारी आहे. तर खासगी व्यक्ति विठोबा शिरसाठ शेतमजुरी करतो. तक्रारदारांच्या आईचे नाव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजनेच्या अंतर्गत वडिलांच्या सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी मंडल अधिकारी पांडुरंग कोळी याने बुधवारी (दि.६) तक्रारदाराकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ही रक्कम 9 हजार रुपये इतकी ठरवून देण्याचे ठरले गेले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा केली.

दरम्यान ठरल्या नुसार तक्रारदारा कडून 9 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मंडल अधिकारी कोळी याने मान्य केले.  लाचेची रक्कम कोळी यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती विठोबा जयराम शिरसाठ याने गुरुवारी (दि.७) स्वीकारली. दबा धरून बसलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तात्काळ खासगी व्यक्ति शिरसाठ आणि मंडल अधिकारी कोळी याला लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -