घरताज्या घडामोडीगोराईत छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय साकारणार, मंगल प्रभात लोढांची माहिती

गोराईत छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय साकारणार, मंगल प्रभात लोढांची माहिती

Subscribe

गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले असून आता या ठिकाणी लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य आणि आरमार संदर्भात प्रेरणा तसेच माहिती देणारे एक भव्य संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी दिली. या संग्रहालायामुळे पुढील पिढ्यांना छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गोराई परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम होते. हे बांधकाम पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार सरकारकडून हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. आता या जागेवर संग्रहालय उभारण्यात येणार आहे.  मंगल प्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार मुंबई उपनगर परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई केली जात आहे. अलीकडेच मालवणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 349वा वर्धापनदिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत आणि पुण्यातील लाल महलामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त मावळ्यांच्या वेशभूषेत किल्ले रायगडावर दाखल झाले होते. या सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर एकीकडे ढोलताशाचा गजर सुरू होता, तर दुसरीकडे गुलालाची उधळण करण्यात आली. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ अँड सन्सकडून सोन्याच्या खास 350 होनांची निर्मिती करण्यात आली होती. याच सोन्यांच्या होनांनी शिवरायांना अभिषेक करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा : Ambadas Danve : औरंगाबाद, अहमदनगर ते पुणे महामार्ग सहापदरी करा; दानवेंची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -