घरमहाराष्ट्रएक दहावी पास, तर डॉक्टरेट; महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 'हे' आहेत सर्वात गरीब आणि...

एक दहावी पास, तर डॉक्टरेट; महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ‘हे’ आहेत सर्वात गरीब आणि श्रीमंत मंत्री

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी पार पडला. यात पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटातील जवळपास 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर एकूण 22 मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहेत. यात 18 मंत्र्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास प्रत्येक मंत्र्यांबाबत थक्क करणारी माहिती समोर येत आहे. यात 18 मंत्र्यांपैकी जवळपास 12 मंत्र्यांविरोधात राजकीय, गुन्हेगारी स्वरुपातील गुन्हे दाखल आहेत. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांपैकी सर्वाधिक संपत्ती म्हणजे कोट्याधीश असलेला मंत्री म्हणजे भाजपचे मंगलप्रभात लोढा. त्यांच्याकडे 441 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर सर्वांत कमी संपत्ती असलेले मंत्री म्हणजे संदीपान भुमरे. त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात मंत्रिमंडळातील एक मंत्री दहावी पास आहे तर एक मंत्र्याने डॉक्टरेटची पदवी संपादन केली आहे.

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वचं मंत्री कोट्याधीश आहेत. यातील सर्वाधिक संपत्ती मलबार हिलचे आमदार आणि भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावे आहे. पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले मंगलप्रभात लोढा यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे 441 कोटींची संपत्ती आहे. सहा वेळी आमदार राहिलेले मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 252 कोटींची रोकड आणि दागदागिन्यां स्वरुपातील आणि 189 कोटी रुपयांची स्तावर (बंगला, प्लॅट) मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्या नावे मुंबईत पाच प्लॅट आहेत. लोढांविरोधात आत्तापर्यंत 5 गुन्हे दाखल आहे.

- Advertisement -

उस्मानाबादच्या परांडा मतदारसंघाचे विजय आमदार आणि एकनाथ शिंदे समर्थक तानाजी सावंत यांच्याकडे लोढा यांच्याखालोखाल 115 कोटींची संपत्ती आहे. तर तिसऱ्या स्थानी सावंतवाडीचे आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. त्यांच्याकडे 82 कोटींची संपत्ती आहे. यानंतर सर्वात गरीब आमदार म्हणून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्या नाव येते. शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे 2 कोटींच्या संपत्तीसह मंत्रिमंडळातील सर्वात गरीब आमदार आहेत. मागील 35 वर्षांतून भुमरे शिवसेनेसाठी काम करत आहेत.

दरम्यान इतर मंत्र्यांबाबत विचार केल्यास, भाजपच्या विजय गावित यांच्याकडे 27 कोटींची संपत्ती आहे, त्यानंतर गिरीश महाजन यांच्याकडे 25 कोटी, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे 24 कोटी, अतुल सावे यांच्याकडे 22 कोटी, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे 11 कोटी, तर शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे 20 कोटी, शंभुराज देसाई यांच्याकडे 14 कोटी आणि दादा भुसे यांच्याकडे ११ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील सर्वच मंत्री हे कोट्याधीश आहेत.

- Advertisement -

शिंदे फडणवीस मंत्रिमंडळतील एक मंत्री दहावी पास आहे, तर दुसरा थेट डॉक्टरेट पदवी संपादन करणार आहे. 18 मंत्र्यांपैकी 5 मंत्री बारावी पास आहेत. तर एका मंत्री इंजिनीअर, सात मंत्री पदवीधर आहे. याशिवाय दोन मंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. एका मंत्र्याने डॉक्टरेट पदवी मिळवली आहे, यात भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे हे सर्वोच्च शिक्षण घेतलेल मंत्री आहेत.


हेही वाचा : ‘फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली; शिवसेनेची टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -